🔰"मैदानी खेळामुळे मानसिक, शारीरिक स्वास्थ्य चांगले राहते"- सौ.सविता दोशी

 🔰"मैदानी खेळामुळे मानसिक, शारीरिक स्वास्थ्य चांगले राहते"-  सौ.सविता दोशी 

वृत्त एकसत्ता न्यूज 

आकाश भाग्यवंत नायकुडे

मुंबई दिनांक 27 डिसेंबर 2024 : अभ्यासाबरोबर खेळायला ही अतिशय महत्त्व आहे ज्या खेळाची आपल्याला आवड आहे तो खेळ जिद्दीने खेळला तरच आपण जिल्हास्तर राज्यस्तर देशपातळीवर यश मिळवू शकतो. मैदानी खेळामुळे मानसिक शारीरिक स्वास्थ्य चांगले राहते सध्या मोबाईलचा वापर वाढल्यामुळे विद्यार्थी बराच काळ घरात बसून मोबाईलवर गेम खेळतात त्यामुळे मैदानी खेळांचे महत्त्व कमी झाले आहे मोबाईल आवश्यक आहे परंतु त्याचा गरजेपुरता वापर करणे अतिशय आवश्यक आहे.

शांतिनिकेतन ची आठवण करून देणाऱ्या निसर्गरम्य वातावरणातील शाळा - सी.ए. निलेश मर्दा

 या शाळेमध्ये येण्याचा योग क्रीडा स्पर्धेच्या निमित्ताने आला .आज आपण सहज पाहिले तर आपल्यामध्ये  वेगवेगळ्या तीन स्तरांचे लोक आहेत बाल, तरुण व काही ज्येष्ठ मंडळी आहेत. आपल्यामध्ये कोणी, उद्योग , व्यवसायिक, नोकरी , परीक्षर्थी व विद्यार्थी बसलेले आहेत पण प्रत्येकाला प्रत्येकाचे काम  सुरू करण्यापूर्वी त्याची पूर्वतयारी करावी लागते. त्यासाठी सातत्य ,सराव अतिशय महत्त्वाचा असतो कारण त्यातून अनेक अनुभव येतात आणि आपण तयार होतो त्यातून आपल्याला प्रतिस्पर्ध्याची चाल ओळखता येते. खेळाडू चिरकाल तरुण, निरोगी असतात आणि निरोगी शरीरामध्ये निरोगी मन वास करते. खेळामुळे शारीरिक समृद्धी प्राप्त होते.

 प्रत्येकाला जय पराजय खेळाडू वृत्तीने स्वीकारता आला पाहिजे माणूस कितीही वेळा हरला तरी फिनिक्स प्रमाणे झेप घेणे महत्त्वाचे असते तर आणि तरच आकाशाला गवसनी घालता येते - रविंद्र डुडू

 

विद्यार्थ्यांनी खेळाकडे करीअर म्हणून पहा  विद्यार्थ्यांनी अभ्यासाबरोबरच खेळाकडे पूर्णपणे लक्ष देणे गरजेचे आहे असे केल्यास विद्यार्थी खेळात आपले करिअर बनवू शकतात. शरीर व मन तंदुरुस्त  राहण्यासाठी दररोज व्यायाम करणे आवश्यक आहे . शालेय जीवनापासून व्यायामाच्या सवय लावणे खूप  महत्त्वाचे आहे. दररोज मैदानी खेळ खेळल्याने आत्मविश्वाससही वाढतो . एखादा विद्यार्थी खेळामध्ये यश संपादन करून क्लास वन अधिकारी बनू शकतो 

विद्यार्थ्यांनी खेळाकडे करीअर म्हणून पहा - अनंतलाल दोशी  

 येथील विद्यार्थ्यांनी जिल्हास्तर, राज्यस्तरीय स्पर्धेमध्ये यश मिळवून स्वतःबरोबर शाळेचे नाव उज्वल केले आहे यापुढेही त्यांनी क्रीडा स्पर्धांमध्ये आपले नाव देशपातळीवर न्यावे . यासाठी शाळा त्यांना हवी ती मदत करेल असे आश्वासन दिले यावेळी विद्यार्थ्यांनी नेत्रदीपक अशी योगा प्रात्यक्षिके करून दाखविली. यावेळी क्रीडा शिक्षिका स्वाती शेंडगे यांनी आपले मनोगत व्यक्त केले  प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते मैदानाचे उद्घाटन करून स्पर्धेची सुरुवात करण्यात आली. या कार्यक्रमासाठी संचालक चंद्रप्रभू प्रा.बि.शे. स. पतसंस्था नातेपुते रवींद्र डुडू, संस्थापक अध्यक्ष रत्नत्रय परिवार, अनंतलाल दोशी, सी.ए. पंढरपूर  निलेश मर्दा ,अध्यक्ष जैन सोशल ग्रुप,फलटण सौ.सविता दोशी  , संस्थेचे मार्गदर्शक वीरकुमार दोशी , संस्थेचे सचिव  प्रमोद दोशी , चेअरपर्सन दहिगाव अमित गांधी, चेअरपर्सन दहिगाव रौनक चंकेश्वरा, सभापती नातेपुते वैभव शहा, सनत कुमार दोशी, रामदास करणे, सुरेश धाईंजे, बबन गोफणे, ज्ञानेश राऊत, इ.प्रशाला समिती सदस्य, मुख्याध्यापक दैवत वाघमोडे ,सर्व शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते कार्यक्रमाचे प्रास्ताविक सविता देसाई व सूत्रसंचालन अमृता मोहिते यांनी केले

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या