कोल्हापूर सांगली जिल्ह्यातील शेतकरी व ठकसेनी कंत्राटदार
वृत्त एकसत्ता न्यूज
संकलन : आकाश भाग्यवंत नायकुडे
मुंबई दिनांक 29 डिसेंबर 2024 : गेला आठवडाभर मुख्यमंत्री पासून लहान लहान ुढार्यांच्या पर्यंत बीड जिल्ह्याबद्दल काही विधाने केली जात आहेत यामध्ये बीड जिल्ह्यातील दहशत व गुंडगिरी ही मोडून काढण्याची भाषा केली जात आहे हे पाहिल्यानंतर आपल्या महाराष्ट्रात गेली 25 वर्षे कोणत्याही पक्षाचे अगर आघाडीचे सरकार नव्हते की काय असा प्रश्न माझ्यासारख्या व्यक्तीच्या मनात उभारत आहे.
*गरीब शेतमजूराचा जिल्ह्या
कारण बीड जिल्हा हा दुष्काळी जिल्हा म्हणून महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे बीड जिल्ह्यातील दुष्काळ व त्यातील मागासलेपणा हा सर्वांना माहीत आहे अशा अवस्थेत तेथील गरीबी व बेरोजगारी व शेतमजूर याबद्दलची माहिती सर्वांनाच आहे येथील गरिबीमुळे अनेक शेतकरी हे शेती नसल्याने महाराष्ट्रभर शेतमजुरीची कामे करण्यास जातात आपल्या कोल्हापूर सांगली जिल्ह्यातील ऊस पट्ट्यामध्ये हे सर्व शेतमजूर ऊस तोडणी साठी चार चार महिने येऊन राहतात व थंडी वारा पाऊस ऊन यामध्ये पाले व झोपड्या आपल्या मुलाबाळा सह राहतात अर्थातच या मुलाबाळांची शिक्षण भविष्य हे सर्वच पणाला लावले जाते हे शेतमजूर चार महिने राबून आपला पगार घेऊन आपल्या जनावरासह व कुटुंबास पुन्हा बीड जिल्ह्यात जात हे सर्व काही काळ व्यवस्थित सुरू होते.
*कंत्राटी पद्धतीचा उदय
त्यानंतर आपल्या देशात कंत्राटी पद्धतीचा फार मोठ्या प्रमाणावर उदय झाला राजकीय पक्ष सुद्धा कंत्राटी पद्धतीने प्रचार करू लागले सभा आयोजित करू लागले मेळावे करू लागले त्यामुळे हे राब राबून ऊस तोडणी करणारे गरीब कामगार यांच्यामध्ये काही कंत्राटदार तयार झाले त्यांनी कोल्हापूर सांगली जिल्ह्यातील अनेक ऊसउत्पादक शेतकऱ्यांच्या बरोबर करार केले लाखो रुपये उचलले व ऊस तोडणीच्या टोळ्या घेऊन येतो म्हणून फरारी झाले कोल्हापूर जिल्ह्यातील ऊस शेतकरी त्यांच्या टोळी घेऊन येण्याच्या वाटेवर डोळे लावून बसले पण हे ठकसेन पुन्हा फिरकले नाहीत.
*त्रस्त ऊसउत्पादक
आधीच येणाऱ्या निरनिराळया खर्चामुळे व अवर्षण, दुष्काळ अतिवृष्टी, साखर कारखानदारांची मुजोरी या दुष्टचक्रात सापडलेला ऊस उत्पादक शेतकरी हा या नवीन ठकसेन कंत्राटदारांच्या तावडीत सापडला अक्षरशः लाखो रुपये ऍडव्हान्स घेऊन हे ठकसेन त फरारी होतात कोल्हापूर जिल्हा पोलीस यांच्या तक्रारी नोंदवून तपासाचे काम करतात पण बीड जिल्ह्यात गेल्यानंतर अशा तपासण्या
निष्प्रभ झालेल्या आहेत. न्यायालयाने बीड पोलिसांना तपासाला पाठवलेले कागद तपास न होता आरोपी सापडत नाहीत या मुद्द्यावर परत आले आहेत अनेक शेतकरी गेली अनेक वर्षे या ठिकणी कंत्राटदारांना बळी पडले आहेत.
*शेतकरी नेते काय करत होते?
या भागातील बारीक सरिक गोष्टीवर आंदोलने उभी करणे व जनतेला वेठीधरणारे फुढारी असतात पण हा ऊस उत्पादक शेतकऱ्यांना लुटणाऱ्या ठकसेना बद्दल कोणी काही बोलत नाही.
*आघाडी असो युती असो
सगळे एकाच माळेचे मणी
या राज्यात काही काळ बराच काळ काँग्रेस व राष्ट्रवादीचे शासन होते. त्यानंतर युतीशासन आले त्यानंतर महाआघाडीचे शासन आले. पण कोणत्याही शासनाने या लुबाडल्या गेलेल्या ऊस उत्पादक शेतकऱ्यास न्याय दिला नाही.
हे या राजकर्तेना बीड मधील कोणते राजकारणी या कंत्राटी शिक्षणाला कंत्राटी ठकसेनाना संरक्षण देत आहे हे माहीत नव्हते का पण राजकारण करायचे ते पैशासाठी व पैसा घेऊन त्या जीवावर पुन्हा निवडून यायचे व पुन्हा पैसा गोळा करायचा हे दुष्टचक्र सुरू आहे. आपल्या पुढील सात पिढ्यांच्या व्यवस्था करतअनेक शेतकरी बळी गेले आहेत हे राजकारण्याना दिसले नाही का?
आज बीडचा विषय गंभीर आहे म्हणून सर्वांना जाणवत आहे की बीड जिल्ह्यामध्ये गुंडगिरी आहे पण या गुंडगिरीचा फटका गेली 20-25 वर्षे कोल्हापूर सांगली जिल्ह्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना बसला आहे हे कोणास दिसले नाही का ?
माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणीस यांना खरेच जर गुंडगिरी मोडून काढायची असली तर त्यांनी हा विषय पण लावून धरला पाहिजे जे शेतकरी आजपर्यंत या ठकसेनी कंत्राटदारांच्यामुळे फसले गेले आहेत त्यांनी पण आपल्या जुन्या तक्रारी शासनाकडे पाठवाव्यात व खरोखरच जर या शासनाला गुंडगिरी मोडून काढायची असेल तर त्यांनी या तक्रारींचा विचार करावा.
*जाणता राजा की झोपलेला राजा?
आज प्रसिद्धी मिळते म्हणून कोणी बीडच्या गुंडगिरी बद्दल बोलत असेल शरद पवार ,आव्हाड मोर्चा काढत असतील तर त्यांनी इतके दिवस शासनात राहून गप्प का बसले हे आधी जनतेला सांगावे. त्यांना शासन चालवताना या गोष्टी कळाल्या नसतील का आणि असतील तर त्यांनी काय केले व कळाल्या नसतील तर ते शासन चालवण्यास नालायक होते असे म्हणावे लागेल.
ॲड अनिल रुईकर
98 232 55 049
इचलकरंजी
0 टिप्पण्या