प्रताप क्रीडा मंडळाच्या राज्यस्तरीय समूह नृत्य स्पर्धेला प्रारंभ
वृत्त एकसत्ता न्यूज
आकाश भाग्यवंत नायकुडे
मुंबई दिनांक 24/12/2024 : कला, क्रीडा, सांस्कृतिक व सामाजिक क्षेत्रात लौकिक प्राप्त केलेल्या शंकरनगर येथील प्रताप क्रीडा मंडळाच्या वतीने दि. 22 ते 24 डिसेंबर 2024 या कालावधीत आयोजित केलेल्या शालेय मुला-मुलींच्या राज्यस्तरीय समुहनृत्य स्पर्धेला दिमाखात प्रारंभ झाला.
स्मृतिभवन शंकरनगर येथे आयोजित केलेल्या स्पर्धेचे उद्घाटन सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील व श्रीमती रत्नप्रभादेवी मोहिते पाटील यांच्या प्रतिमेचे व नटराजाच्या प्रतिमेचे पूजन बालकलाकारांच्या व मान्यवरांच्या शुभहस्ते करून झाले. मंडळाचे संस्थापक जयसिंह मोहिते पाटील, अध्यक्षा कु.स्वरूपाराणी मोहिते पाटील, अँड.नितीनराव खराडे पाटील, दीपकराव खराडे पाटील, सुमित्रा पतसंस्थेचे चेअरमन महादेवराव अंधारे, उपाध्यक्ष पोपटराव भोसले पाटील, सचिव बिभिषन जाधव, परीक्षक आशिष देसाई, कुणाल मसाले, सागर राऊत प्रमुख उपस्थित होते.
प्रताप क्रीडा मंडळाचे संस्थापक जयसिंह मोहिते पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली व शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष संग्रामसिंह मोहिते पाटील, प्रताप क्रीडा मंडळाच्या अध्यक्षा कु. स्वरूपाराणी मोहिते पाटील, चि.सयाजीराजे मोहिते पाटील यांच्या नेतृत्वाखाली या स्पर्धा संपन्न होत आहेत.
या स्पर्धेसाठी एकूण पाच गट असून स्पर्धेच्या पहिल्या दिवशी रोजी सकाळ सत्रात गट पहिला इयत्ता 1 ते 4 थी (कॅसेट गीत) मध्ये ग्रामीण गटात 9 गिते सादर झाली.
या गटात प्रथम क्रमांक जिल्हा परिषद प्राथमिक शाळा शिंदेवाडी, द्वितीय क्रमांक जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वाडी नंबर 2, तृतीय क्रमांक लोकविकास मराठी मिडीयम स्कूल वेळापूर. चौथा क्रमांक श्रीराम इंग्लिश मीडियम स्कूल जांभूड यांनी मिळवले, तर
शहरी गटात 8 गिते सादर झाली. या गटात प्रथम क्रमांक महर्षि शंकरराव मोहिते प्रशाला प्राथमिक विभाग शंकरनगर, द्वितीय क्रमांक श्रीमती रत्नप्रभादेवी मोहिते पाटील प्राथमिक विभाग कोथरूड, तृतीय क्रमांक जयसिंह मोहिते पाटील विद्यालय संग्रामनगर. यांनी पटकावला.सर्व विजेत्या संघांना रोख रक्कम, सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र मान्यवरांच्या शुभहस्ते देऊन गौरविण्यात आले. सूत्रसंचालन प्रा.डॉ. विश्वनाथ आवड, पोपटराव पवार, डॉ.आर.आर पाटील, किरण सूर्यवंशी यांनी केले.
स्पर्धा प्रमुख मुख्याध्यापक संजय गळीतकर, दिलीप शिर्के, नामदेव काळे प्रमुख उपस्थित होते.
दुपार सत्रात गट दुसरा इयत्ता 5 वी ते 7 वी ग्रामीण व शहरी कॅसेट गीत (पारंपारिक लोकनृत्य) सादर झाले.
0 टिप्पण्या