"हिशोबात अतिशय ट्रान्सपरन्सी असणारी एकमेव संस्था म्हणजे " - सी.ए. शशील गांधी

 

"हिशोबात अतिशय ट्रान्सपरन्सी असणारी एकमेव संस्था म्हणजे " - सी.ए. शशील गांधी

वृत्त एकसत्ता न्यूज 

आकाश भाग्यवंत नायकुडे

मुंबई दिनांक 25 डिसेंबर 2024 :

"शिक्षणाबरोबरच संस्कार आणि व्यवहार ज्ञान देणारी निसर्ग सौंदर्याच्या सानिध्यात असणारी , उत्कृष्ट इन्फ्रास्ट्रक्चर ,प्रशिक्षित शिक्षक वर्ग ,भव्य मैदान ,झाडे गुणवत्तापूर्ण शिक्षण देणारी, हिशोबात अतिशय ट्रान्सपरन्सी; असणारी एकमेव संस्था आणि अशा शिक्षण संस्थेतून डॉक्टर, इंजिनियर, वकील सोबतच अनेक सी.ए  तयार व्हावेत, देशाचा आर्थिक कणा मजबूत करण्यासाठी शालेय जीवनामध्ये व्यवसाय व औद्योगिक ज्ञान मिळणे आवश्यक आहे, तसेच रत्नत्रय ही संस्था अतिशय ट्रान्सपरन्सी असणारी एकमेव संस्था आहे" असे  मत सी.ए.शशील गांधी यांनी प्रतिपादित केले.

शाळेत बाजार दिवस आयोजित केल्यास देशाचा आर्थिक कणा मजबूत करणारे यशस्वी उद्योजक तयार होतील.

   " If you are great demand in the market you are the king of market,  असा महान अर्थशास्त्रज्ञांचा दाखला  देत बाजार दिवस यशस्वी उद्योजक तयार करण्यासाठी  साजरा करावा.  मागणी, पुरवठा, वजन मापनशास्त्र ,मार्केटिंग कौशल्य, व्यवहार ज्ञान, पैशाची किंमत, अशी पंचसूत्री आवश्यक असून शिक्षकांनी विद्यार्थ्यांना व्यावसायिक, उद्योजक बनण्यासाठी ही पंचसूत्री शालेय जीवनातच आत्मसात करायला शिकवले पाहिजे". असे मत शनिवार 21 डिसेंबर रोजी "रत्नत्रय इंग्लिश मीडियम स्कूल, विद्यालय ज्यु. कॉलेज मांडवे" येथे आयोजित करण्यात आलेल्या बाजार दिवसानिमित्त ॲड. मयूर शहा यांनी आपल्या मनोगतातून व्यक्त केले. 

तर  21 डिसेंबर चे महत्व म्हणजे वर्षातील सर्वात मोठी रात्र व लहान दिवस या दिवसालाच हिवाळी संक्रांत असे हे म्हणतात असे 21 डिसेंबर चे महत्व नितीन कुदळे यांनी मनोगतातून पटवून दिले. 

बाजार दिवसाच्या माध्यमातून व्यवहार ज्ञान तर कळतेच पण विद्यार्थ्यांना कुटुंब कसे चालते याचे ही ज्ञान येते. माळशिरस तालुक्यातून अनेक विद्यार्थी घडावेत यासाठी अकलूज सी. ए. असोसिएशन विद्यार्थ्यांना सी.ए. बनण्यासाठी मार्गदर्शन करेल असे आश्वासन रिखवलाल फडे यांनी आपल्या मार्गदर्शनातून दिले.

सामाजिक विचार घेऊन सुरू झालेली संस्था  अनेक राष्ट्रीय सण ,सांस्कृतिक, सामाजिक, क्रीडा विषयक माहिती प्रात्यक्षिक ज्ञान देऊन विद्यार्थ्यांना प्रगत बनवते परंतु सर्व विद्यार्थी नोकरी करू शकतात असे नाही तर जे विद्यार्थी उद्योगाकडे वळतात त्यांना व्यवहार ज्ञान कळावे यासाठी बाजार दिवसाचे आयोजन केले जाते असे रत्नत्रय परिवाराचे संस्थापक अनंतलाल रतनचंद दोशी यांनी मार्गदर्शनातून व्यक्त केले.

बालचमूंचा आनंदी बाजार दिवस यामध्ये 199 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता त्यामध्ये विविध पालेभाज्या, फळभाज्या, खाद्यपदार्थ, जनरल स्टोअर्स, थंड पेय इत्यादी विविध प्रकारचे स्टॉल लावण्यात आलेले होते  बाजारात जवळजवळ 1.97 लाखापर्यंतची उलाढाल झाली. बाजार दिवस साजरा करण्यासाठी प्रमुख पाहुणे  रिखवलाल फडे सी.ए. अकलूज, अनंतलाल  दोशी  संस्थापक अध्यक्ष रत्नत्रय परिवार, शशील गांधी सी.ए  अकलूज, नितीन कुदळे सी.ए. अकलूज, अमित दोशी सीए माळशिरस, मयूर फडे सी.ए. अकलूज, राहुल पिसे कर सल्लागार नातेपुते, ॲड.  मयूर शहा कर सल्लागार नातेपुते, अजितकुमार दोशी, सदाशिवनगरचे सरपंच , संस्थेचे मार्गदर्शक  वीरकुमार दोशी ,संस्था सचिव प्रमोद दोशी ,अभिजित दोशी, बाहुबली दोशी, वैभव शहा , अभिजीत दोभाडा ,अमित गांधी, रामदास कर्णे सुरेश धाईंजे ,रवींद्र कुलकर्णी, मृणालिनी दोशी ,भाग्यश्री दोशी, विनयश्री दोशी, पूनम दोशी ,धनश्री दोशी ,पार्वती जाधव, सारिका राऊत ,इत्यादी सर्व कमिटी मेंबर्स मुख्याध्यापक दैवत वाघमोडे, सर्व शाखा मुख्याध्यापक, शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी, पालक  इत्यादी सर्व मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राजक्ता गाढवे व आभार वनिता निंबाळकर यांनी मानले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या