यादोकी की बारात भाग 2
वृत्त एकसत्ता न्यूज
संकलन : आकाश भाग्यवंत नायकुडे
मुंबई दिनांक 28 डिसेंबर 2024 :
काल मी इचलकरंजी सुवर्ण महोत्सवी साहित्य संमेलनाबद्दल थोडेसे लिखाण केले होते आज इचलकरंजीत यांच्या आठवणीसाठी म्हणून एक भव्य दिव्य कार्यक्रम होत आहे माझ्या पूर्वनियोजित कोर्ट कामकाजामुळे मी परगावी असल्याने या कार्यक्रमास कार्यक्रमातील आनंद घेण्यास मी मुकलो आहे याची खंत आहे.
1974 साली झालेल्या या साहित्य संमेलनाच्या आठवणी अजून ताज्या आहेत बघता बघता 50 वर्ष होऊन गेली. तीन दिवस चाललेले ही साहित्यिक मेजवानी इचलकरंजीकर विसरू शकत नाहीत इचलकरंजी काय पण ज्यांनी ज्यांनी या साहित्य संमेलनात भाग घेतला ते पण हे विसरू शकणार नाहीत.
अविस्मरणीय हे संमेलन गोविंदराव हायस्कूलच्या पटांगणात पार पडले.
प्रचंड व्यवस्था व कार्यक्रमाचे अचूक नियोजन हे याचे वैशिष्ट्य होते
वि.स. खांडेकर रणजीत देसाई पासून अगदी सर्व लहान मोठे साहित्यिक मोठ्या हिरीरीने या साहित्य संमेलनात हजर होते.
शाहीर जगतापांच्या पोवाड्याने या कार्यक्रमास सुरुवात झाली व कै श्रीमती जोशी वहिनी( सौ आबा जोशी) कै दातारवहीनी(सौ वसंतराव दातार)यांच्या समवेत कै शेंडे सरांच्या संगीताने स्वागत गीत झाले.
या कार्यक्रमाच्या वेळी इचलकरंजीचे लोकनियुक्त नगराध्यक्ष पंडितराव कुलकर्णी हे प्रथम नागरिक म्हणून या कार्यक्रमात तीनही दिवस एखाद्या सामान्य कार्यकर्त्या सारखे राबत होते.
इचलकरंजीकर नागरिकांनी आलेल्या साहित्यिकांची असा पाहूणचार केला साहित्यिक हा पाहुणचार विसरू शकले नाहीत.
परिसंवाद कवी संमेलन द.मा. मिरासदार व शंकर पाटील ,व्यंकटेश माडगूळकर यांचे कथाकथन ,ग्रंथ दिंडी एकापेक्षा एक सरस कार्यक्रमाने या साहित्य संमेलनात रंग भरला होता.
जिथे मनुष्य आहे तिथे मानवी स्वभाव आहे मानापमान , रुसवा फुगवा तर असायचाच पण डॉक्टर मर्दा यांनी तर या सर्व नाराज व्यक्तिमत्त्वांना सांभाळून, त्याचे इगो सांभाळून घेण्याचे व्रतच घेतलै होते.
तीन दिवस ज्याप्रमाणे साहित्यिकांची इच्छा भोजने पार पडली त्याप्रमाणे डॉक्टर मर्दाच्या वैद्यकीय टीमने या सर्वांची मोफत वैद्यकीय तपासणी ही पार पाडली.
अनेक साहित्यिकांना दर सहा महिन्याला इथे साहित्य संमेलन व्हावे व आपल्या वैद्यकीय चाचण्या पार पाडाव्यात असे वाटत असावे.
दृष्ट लागण्यासारख्या कार्यक्रमात मी कार्यकर्ता व फोटोग्राफर म्हणून हजर होतो हे माझे पूर्व संचित.
कालच्या माझ्या लेखानंतर माझ्या फोटोग्राफी बद्दल काही वाचकांनी मला आठवण करून दिली व विचारणा केली त्यासाठी हा खुलासा माझा परममित्र कै बाळ खांडेकर हा दोन वर्षे जळगाव अमळनेर भागात प्रचारक म्हणून गेला होता तो परत आला त्यावेळी त्यास उदरनिर्वाहाचे साधन नव्हते माननीय भिडे गुरुजींनी मला आता तू प्रचारक जाणार आहेस स्टुडिओ बाळ खांडेकरला देऊन टाक म्हणून सांगितले व मी भिडे गुरुजी आज्ञा प्रमाण मानून हा फोटोग्राफीचा व्यवसाय बाळ खांडेकरला तसाच देऊन टाकला यास कोल्हापूरचा माधव ठाकूर व मा. भिडे गुरुजी,सुधीर हर्डीकर साक्षीदार आहेत त्यानंतर बाळ खांडेकर याने अनेक वर्षे हा व्यवसाय केला.
ॲड अनिल रुईकर
इचलकरंजी
98 232 5 5049

0 टिप्पण्या