ओंकार साखर कारखान्याचा ऊसाचा पहिला हप्ता 2800/-रूपये प्रमाणे शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा - बाबुराव बोत्रे-पाटील

 

ओंकार साखर कारखान्याचा ऊसाचा पहिला हप्ता 2800/-रूपये प्रमाणे शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा -  बाबुराव बोत्रे-पाटील   

वृत्त एकसत्ता न्यूज 

आकाश भाग्यवंत नायकुडे

निमगाव प्रतिनिधी/ मुंबई दिनांक 24 डिसेंबर 2024 :   

ओंकार साखर कारखाना चांदापुरी युनिट एक चा 2024 -  2025 या सिझनच्या गाळपास आलेल्या ऊसास पहिल्या पंधरवड्याचा 15 नोव्हेंबर ते 30 नोव्हेंबर पर्यंत च्या ऊसास 2800/- रूपये प्रमाणे शेतकऱ्यांच्या बॅक  खात्यात पहिला हप्ता  जमा झाल्याची माहिती ओंकार साखर परिवाराचे सर्वेसर्वा चेअरमन बाबुराव बोत्रे-पाटील  यांनी दिली. चेअरमन बाबुराव बोत्रे-पाटील यांनी गळीत हंगामाच्या शुभारंभास जाहीर केल्याप्रमाणे ऊसास उच्चांकी दर देणार असुन शेतकऱ्यांच्या खात्यावर वेळेत पैसे देण्याची परंपरा चालु ठेवली असुन दिलेला शब्द प्रत्याक्षात अंमलात आणाला. त्याबद्दल ऊस  शेतकऱी सर्जेराव पवार, प्रकाश मगर, अशोक मगर, सर्जेराव पिंगळे, नितीन जाधव यांनी चेअरमन बाबुराव बोत्रे-पाटील, संचालक प्रशांतराव बोत्रे-पाटील यांचे अभिनंदन केले. या वेळी जनरल मॅनेजर भिमराव वाघमोङे, केन मॅनेजर शरद देवकर, चीफ इंजिनिअर तानाजीराव देवकते, रमेश आवताङे   हे उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या