🎋 महाराष्ट्रातील पहिली स्वतंत्र महिला बांबू शेतकरी अनुराधा काशिद यांची बांबू सोसायटी ऑफ इंडिया (BSI) महाराष्ट्र अध्यायाच्या कार्यकारिणी सदस्यपदी बिनविरोध निवड
वृत्त एकसत्ता न्यूज
संकलन : आकाश भाग्यवंत नायकुडे
मुंबई दिनांक 27/11/ 2024 : बांबू क्षेत्रातील अग्रणी कार्याची दखल घेऊन, अनुराधा काशिद यांची बांबू सोसायटी ऑफ इंडिया (BSI) महाराष्ट्र अध्यायाच्या कार्यकारिणी सदस्यपदी बिनविरोध निवड झाली आहे.
अनुराधा काशिद, या महाराष्ट्रातील पहिल्या स्वतंत्र महिला बांबू शेतकरी, आणि "द बांबू सेतू" च्या संस्थापिका आहेत.
शाश्वत विकासासाठी बांबूच्या विविध उपयोगांवर "अनुराधा काशिद" यांनी उत्कृष्ट कार्य केले आहे. त्यांच्या बांबू फार्म "द बांबू सेतू" येथे त्यांनी बांबू लागवड, संरक्षण, मूल्यवर्धन, बांधकाम, हस्तकला, ग्रामीण विकास, महिला व युवक सशक्तीकरण यांसारख्या क्षेत्रांत महत्त्वपूर्ण प्रकल्प राबवले आहेत. याशिवाय त्यांनी अनेक कार्यशाळा, प्रशिक्षण कार्यक्रम, आणि नवकल्पनांच्या माध्यमातून बांबूची उपयुक्तता समाजापर्यंत पोहोचवली आहे.
बांबू सोसायटी ऑफ इंडिया (BSI) ही देशपातळीवरील संस्था असून, बांबू संशोधन, विकास, आणि प्रचारासाठी कार्यरत आहे. या संस्थेच्या महाराष्ट्र अध्यायामध्ये निवड झाल्यामुळे अनुराधा काशिद यांना राज्यातील बांबू क्षेत्राच्या वाढीसाठी योगदान देण्याची संधी मिळाली आहे. अनुराधा काशीद यांच्या निवडीबद्दल सर्व स्तरातून त्यांचे वर अभिनंदन याचा वर्षाव होत आहे.
“ही निवड माझ्यासाठी अभिमानाची बाब असून, बांबूच्या शाश्वत विकासासाठी माझे सर्वतोपरी प्रयत्न राहतील,”_अनुराधा काशिद 🎋
द बांबू सेतू
9158197646 | 9421789088
thebamboosetu@gmail.com
0 टिप्पण्या