सहकार महर्षि अभियांत्रिकी महाविद्यालयाचा विद्यार्थी रुद्रतेज अमरसिंह माने देशमुख यांचे वेटलिफ्टिंग विद्यापीठ संघात निवड

 

सहकार महर्षि अभियांत्रिकी महाविद्यालयाचा विद्यार्थी रुद्रतेज अमरसिंह माने देशमुख यांचे वेटलिफ्टिंग विद्यापीठ संघात निवड

वृत्त एकसत्ता न्यूज 

आकाश भाग्यवंत नायकुडे

मुंबई दिनांक 29/11/2024 : येथील सहकार महर्षि अभियांत्रिकी पदवी मेकॅनिकल विभागातील विद्यार्थी  रुद्रतेज अमरसिंह माने- देशमुख याची डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ लोणेरे यांच्या वेटलिफ्टिंग संघात 104 किलो वजन गटात निवड झाली आहे. सदर निवडी बद्दल महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. प्रवीण ढवळे, महाविद्यालय विकास समिती  अध्यक्षा कु. स्वरूपाराणी जयसिंह मोहिते- पाटील, ट्रस्टचे सचिव  राजेंद्र चौगुले व ट्रस्टचे अध्यक्ष जयसिंह शंकरराव मोहिते- पाटील यांनी अभिनंदन केले.

  अंतर विद्यापीठ स्पर्धा आंध्रप्रदेशातील गुंटूर येथील आचार्य नागार्जुन विद्यापीठ येथे दिनांक 30/11/2024 ते 03/12/2024 या कालावधीत होत आहेत. सदर स्पर्धेसाठी रुद्रतेज अमरसिंह माने-देशमुख आंध्रप्रदेशला रवाना झाला आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या