विधानसभेत सप्त धनगर!
आमदार
वृत्त एकसत्ता न्यूज
संकलन : आकाश भाग्यवंत नायकुडे
मुंबई दिनांक 28/11/2024 : मी या आधी निवडून आलेल्या धनगरांची संख्या सहा आहे अस म्हटल होत. पण ही संख्या सहा नसून सात आहे.
पहिली यादी,
1 डॉ बाबासाहेब देशमुख सांगोला (शेकाप)
2 नारायण पाटील करमाळा राष्ट्रवादी (शप)
3 गोपीचंद पडळकर जत भाजप
4 उत्तमराव जानकर माळशिरस राष्ट्रवादी (शप)
5 दत्ता भरणे इंदापूर राष्ट्रवादी (अप)
6 सचिन कांबळे पाटील फलटण (भाजप)
हे सहा धनगर आमदार निवडून आल्याच आधी मी सांगितले होते. पण अधिक चौकशी केली असता कळले की, दर्यापूर राखीव जागेवर निवडून आलेले,
7 गजानन लवटे दर्यापूर शिवसेना(उबाठा)
गजानन लवटे सुद्धा धनगर आहेत. ते खाटिक धनगर आहेत. ते शिव सेनेत बरेच दिवस कार्यरत आहेत. आपल्या गुणवत्तेवर ते दर्यापूर तालुका खरेदी विक्री संघावर निवडून आले आहेत. शिवसेना फुटल्यावर ते उध्दव ठाकरे यांच्या सोबत गेले. उद्धव ठाकरे यांनी त्यांना दर्यापूर मधून तिकीट दिले आणि ते आता आमदार म्हणुन निवडून आले.
मुंबई पुणे, सांगली, सातारा, सोलापूर इथे खाटिक-धनगर आणि धनगर जसे एकत्र आले तसे विदर्भात आलेले नाहीत. हिंदू खाटिक आणि धनगर या शाखा एक आहेत. त्या धनगर या मूळ जातीच्या दोन शाखा आहेत हा विचार तिकडे अजून रुजला नाही. त्यामुळे तिकडे खाटिक आणि धनगर एक झाले नाहीत. तरी काही अल्प प्रमाणात हा विचार तिकडे रुजवण्यात येत आहे. काही लोक तसा प्रयत्न करत आहेत. यात वाढ करा.
माझ बोलण आपल्या एका समाज सेवी बांधव मा ज्ञानेश्वर ढोमणे अमरावती यांच्याशी झाले. त्यांनी सांगितले की, "गजानन लवटे हे हिंदू खाटिक आहेत. पण आमच्या कडील तो समाज स्वतःला धनगर मानत नाही." ढोमणे साहेब स्वतः लवटे यांच्या प्रचारात होते. त्यांच्या सोबत त्यांचे एक खाटिक मित्र होते. माकोडे त्यांचे नाव आहे. मी त्यांच्याशी या बाबत सविस्तर बोललो. विदर्भातील हा खाटिक समाज आणि मुंबई पुण्याकडील धनगर खाटिक समाज एकच आहे. त्यांच्यात रोटी बेटी व्यवहार आहेत. याचा अर्थ आ. गजानन लवटे हे सुद्धा धनगर आहेत. त्यांना धरून आता विधान सभेत सात धनगर आमदार झाले आहेत.
या सातही आमदारांनी आपली एकजुट केली पाहिजे. त्यांचे पक्ष कोणतेही असले तरी धनगर मुद्द्यावर एकत्र आल पाहिजे. त्यांनी त्यांच्या पक्षाशी एकनिष्ठ राहीलच पाहिजे. पक्षाच्या कार्यक्रमाला साथ दिलीच पाहिजे. खूप धनगर धनगर ही करू नये. पण जातीचा फायदा करून देण्यासाठी आपल्या नेतृत्वा सोबत चर्चा केली पाहिजे.
सात हा आकडा खूप चान्गला आहे. सप्त ऋषी, सप्त तारे, सप्त सागर, सप्त खंड, सप्त स्वर्ग, सप्त पाताळ. सप्त सूर. तसे सप्त धनगर आमदार झाले आहेत. भविष्यात हा आकडा 70 पर्यंत वाढवत न्या. तो वाढविता आला नाही तरी चालेल पण तो कमी होऊ देवू नका!
मिळालेल्या आमदारकीचा अधिकार वापरून मतदार संघातील सर्व जाती धर्माच्या लोकांसाठी कामे करावी. मतदार संघात सुधारणा कराव्यात, मतदाराचे प्रश्न सोडविण्यासाठी झटावे. आपल्या मतदार संघात पाया मजबूत करावा. तिथून पुन्हा निवडून येण्यासाठी काम करा. भुजबळ, पवार, मोहिते, फडणवीस, शिंदे, हे जसे त्यांच्या मतदार संघात भक्कमपणे उभे आहेत, तसे तुम्ही भक्कम व्हा. परत परत निवडून या म्हणजे तुम्ही गुणवत्तेवर मंत्री व्हाल. जमातीच्या नांवावर किंवा सहानुभूतीवर मिळवलेले मंत्रिपद जास्त काळ टिकत नाही. म्हणुन आपली गुणवत्ता दाखवून मंत्री पद मिळवा. स्पर्धा करत निवडून या. लोकांची सेवा करून निवडून या. तुम्ही मोठे व्हा. समाजाला मोठ करा!
एक गोष्ट लक्षात ठेवा आमदार खासदार मंत्री ही राजपद आहेत. ती लढून मिळवायची असता. रडून किंवा भीक मागून राज पद मिळत नाही. एकदा हरल तर पराभव आव्हान समजून स्विकारा आणि पुढच्या वेळी अधिक कष्ट करून विजय मिळवा.
हवामे ताशका महेल नही बनता,
रोनेसे मुकद्दर नही सुधारता
जितनेका होसला रख्खो,
एक हार से कोई फकीर,
और एक जितसे कोई सिकंदर नही बनता!
बापू हटकर
0 टिप्पण्या