जानकर 卐 तरंगे- पाटील,
गोरड 卐 काकडे , मोटे 卐 लोखंडे
शुभविवाह संपन्न
वृत्त एकसत्ता न्यूज
आकाश भाग्यवंत नायकुडे
मुंबई दिनांक 10/11/2024 : तरंगफळ (तालुका माळशिरस, जिल्हा सोलापूर) येथील कै. मारुती बिरू जानकर यांची नात व सौ. रत्नमाला व श्री गोरख मारुती जानकर यांची तृतीय कन्या चि.सौ. कां. मयुरी आणि कै. भिमराव नारायण तरंगे यांचे नातू व अनिता व श्री लालासाहेब भिमराव तरंगे रा. तरंगफळ, तालुका माळशिरस, जिल्हा सोलापूर यांचे द्वितीय चिरंजीव दिग्विजय यांचा शुभविवाह रविवार दिनांक 10 नोव्हेंबर 2024 रोजी दुपारी 2 वाजून 21 मिनिटांनी संपन्न झाला. शिवशंभो मंगल कार्यालय वेळापूर तालुका माळशिरस जिल्हा सोलापूर येथे थाटाने संपन्न झालेल्या विवाह सोहळ्यामध्ये उपस्थित राहून सद्गुरु श्री श्री साखर कारखान्याचे व्हाईस चेअरमन बाळासाहेब कर्णवर पाटील, माळशिरस तालुका पंचायत समितीचे माजी उपसभापती अर्जुन सिंह मदनसिंह मोहिते पाटील,
प्रताप क्रीडा मंडळाच्या अध्यक्ष स्वरूपाराणी मोहिते पाटील यांचे सह सर्व स्तरीय मान्यवर व्यक्तींनी नववधूवरांना शुभाशीर्वाद देऊन सदिच्छा व्यक्त केल्या. दोन्ही बाजूच्या पाहुणे मंडळींचं आणि उपस्थित मान्यवरांचे स्व. राजमाता रत्नप्रभादेवी मोहिते पाटील बहु उद्देशीय दिव्यांग संस्थेचे संस्थापक अध्यक्ष गोरख मारुती जानकर यांनी सन्मान केला.
0 टिप्पण्या