"राज्य आणि राष्ट्राची अन्न सुरक्षा शाबुत ठेवायची असेल तर महाराष्ट्रचे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांनाच नियुक्त करा"- विठ्ठल राजे पवार

"राज्य आणि राष्ट्राची अन्न सुरक्षा शाबुत ठेवायची असेल तर महाराष्ट्रचे मुख्यमंत्री म्हणून  देवेंद्र फडणवीस यांनाच  नियुक्त करा"- विठ्ठल राजे पवार

वृत्त एकसत्ता न्यूज 

संकलन : आकाश भाग्यवंत नायकुडे

मुंबई दिनांक 27/11/ 2024 : "राज्य आणि राष्ट्राची अन्न सुरक्षा शाबुत ठेवायची असेल तर महाराष्ट्रचे मुख्यमंत्री म्हणून  देवेंद्र फडणवीस यांनाच  नियुक्त करा" अशी मागणी शरदजोशी विचारमंच शेतकरी संघटना महासंघ, संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा निमंत्रक विठ्ठल राजे पवार यांनी ऑनलाइन मुलाखती द्वारे केली असल्याची माहिती महासंघाचे प्रदेश संपर्क व प्रसिद्धी प्रमुख भाग्यवंत लक्ष्मणराव नायकुडे यांनी सांगितली. आज तक, व पुण्यमत.काॅम ने ऑनलाइन  मुलाखत घेतली.

 शेतकऱ्यांचे अनेक प्रश्न थांबलेले आहेत तुंबलेले आहेत, मागील पीक विमा नुकसान भरपाय, यासारखे राज्यातल्या शेतकऱ्यांचे शेतमालातील खरेदी विक्री भावांतरी योजनेतील रक्कम, उसाची थकीत एफ आर पी, दुधाच्या संदर्भात दूध संस्थांनी तीन रुपये लिटरनी कमी केलेले दर, निवडणुका झाल्या झाल्या दूध संतांकडून शेतकऱ्यांच्या लुटीचा झालेला गैर निर्णय.! शेतकऱ्यांच्या निर्णयावरील अनेक आदेश सरकार पारित करावेत, यात सर्वात महत्त्वाचा मुद्दा शेतकऱ्यांचे सरसकट संपूर्ण कर्जमुक्ती बाबत देवेंद्र फडणवीस यांनी आश्वासित केले आहे म्हणून शेतकऱ्यांनी भरभरून मतदान केले आणि २३६ इतक्या जागा निर्णय बहुमत तुम्हाला मिळालेले आहे, शेतकऱ्यांचे अत्यंत महत्त्वाचे आणि गंभीर प्रश्न हे सर्व प्रश्न तसेच राज्य आणि राष्ट्राची अन्न सुरक्षा शाबुत ठेवायची असेल तर महाराष्ट्रचे नवे, मुख्यमंत्री म्हणून  देवेंद्र फडणवीस यांनाच  नियुक्त करा, अनुक्रमे एकनाथ शिंदे, अजित पवार साहेब उपमुख्यमंत्री राहतील आणि या तिघांनीही कोणत्याही भ्रष्टाचारी आमदारांना मंत्री करू नये, स्वच्छ चारित्र्याच्या आमदारांना मंत्री करा, संघटनेचे अध्यक्ष तथा राष्ट्रीय निमंत्रक विठ्ठल राजे पवार यांची, पंतप्रधान व केंद्रीय गृहमंत्र्यांकडे मागणी केली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या