अंतर विभागीय रायफल शूटिंग क्रीडा स्पर्धेमध्ये सहकार महर्षि इंजीनियरिंग कॉलेजच्या विद्यार्थिनीचे यश

 

अंतर विभागीय रायफल शूटिंग क्रीडा स्पर्धेमध्ये सहकार महर्षि इंजीनियरिंग कॉलेजच्या विद्यार्थिनीचे यश

वृत्त एकसत्ता न्यूज 

आकाश भाग्यवंत नायकुडे 

मुंबई दिनांक 17/11/ 2024डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ लोणेरे अंतर्गत अंतर विभागीय क्रीडा स्पर्धा के.आय. टी. शेळवे~पंढरपूर  येथे पार पडल्या त्यामध्ये सहकार महर्षि शंकरराव मोहिते पाटील इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड रिसर्च शंकरनगर अकलूज येथील विद्यार्थिनी प्रेरणा धनाजी राऊत हिने घवघवीत यश संपादन केल्याची माहिती संस्थेचे प्राचार्य डॉ.प्रवीण ढवळे यांनी दिली.

सदरच्या स्पर्धांमध्ये वेट लिफ्टिंग, पावर लिफ्टिंग, रेसलिंग जुडो व रायफल शूटिंग अशा विविध स्पर्धा विद्यापीठाशी संलग्नित असलेल्या विविध संस्थांमध्ये पार पडल्या. त्यामध्ये द्वितीय वर्ष इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग विभागातील प्रेरणा धनाजी राऊत या विद्यार्थिनीने रायफल शूटिंग (महिला गट) (१० मीटर ) या क्रिडाप्रकारात द्वितीय क्रमांक पटकाविला.

विजेत्या विद्यार्थिनीचे संस्थेचे प्राचार्य डॉ. प्रवीण ढवळे, सर्व विभागाचे विभाग प्रमुख, शिक्षक व शिक्षकेतर सेवक यांनी अभिनंदन केले.

सदरच्या विद्यार्थिनीला मार्गदर्शक म्हणून क्रीडाशिक्षक प्राध्यापक विकास शिवशरण यांनी काम पाहिले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या