उद्योजक व नवउद्योजकांसाठी खासदार धैर्यशील मोहिते-पाटील यांचेकडून सुवर्णसंधी

 


उद्योजक व नवउद्योजकांसाठी खासदार धैर्यशील मोहिते-पाटील यांचेकडून सुवर्णसंधी

वृत्त एकसत्ता न्यूज 

आकाश भाग्यवंत नायकुडे 

मुंबई दिनांक 24/11/ 2024 : माढा मतदारसंघाचे खासदार धैर्यशील मोहिते-पाटील यांनी माढा लोकसभा मतदारसंघ व सोलापूर जिल्ह्यातील उद्योजक आणि नवोदित उद्योजकांसाठी गुजरात गांधीनगर येथे शिवरत्न शिक्षण संस्था आणि शिवामृत दूध संघ यांच्या सहकार्याने एक विशेष अभ्यास दौरा आयोजित केला आहे.अभ्यास दौऱ्याचा सर्व खर्च आयोजकांकडून केला जाणार आहे.

या अभ्यास दौऱ्यात सहभागी होण्यासाठी इच्छुक उद्योजकांना ८ डिसेंबर रोजी शिवरत्न नाॅलेज सिटी अकलूज येथे सकाळी 10 वाजता परीक्षेसाठी उपस्थित राहणे आवश्यक आहे. लेखी आणि तोंडी मुलाखतीद्वारे उमेदवारांची निवड करण्यात येईल. निवड झालेल्या उद्योजकांना विविध उद्योगांची पाहणी करण्याची आणि तज्ञांकडून मार्गदर्शन घेण्याची संधी मिळेल.

या उपक्रमाचा उद्देश नवीन उद्योजक निर्माण करणे आणि सध्याचे उद्योजक अधिक सक्षम करणे हा आहे. केंद्र आणि राज्य सरकारच्या योजनांबाबत माहिती देणे, बँकांकडून कर्ज मिळवून देण्यात मदत करणे आणि विविध उद्योग संस्थांशी करार करण्याची संधी उपलब्ध करून देणे हा मुख्य उद्देश आहे.

  "माझ्या माढा लोकसभा  मतदारसंघातील तरुणांना उद्योजकतेच्या क्षेत्रात प्रवीण बनवण्यासाठी, त्यांच्यातल्या उदयोजकतेला संधीं देण्यासाठी गांधीनगर, गुजरात येथे अभ्यास दौरा आयोजित केला आहे. हा दौरा त्यांच्या व्यवसायातील यशाच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल ठरेल. आम्ही त्यांना योग्य मार्गदर्शन, अनुभव आणि प्रेरणा देण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत".- खासदार धैर्यशील राजसिंह मोहिते-पाटील

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या