"ओंकार" च्या मोफत साखरेचे निमगाव येथे शेतकऱ्यांनी केले स्वागत

 

"ओंकार" च्या मोफत साखरेचे  निमगाव येथे   शेतकऱ्यांनी केले स्वागत 

 वृत्त एकसत्ता न्यूज 

निमगाव / प्रतिनिधी दिनांक 20/10/2024 :   "ओंकार" च्या मोफत साखरेचे  निमगाव मगराचे) येथे   शेतकऱ्यांनी  स्वागत केले. सोलापूर जिल्ह्या च्या माळशिरस तालुक्यातील "ओंकार" साखर कारखाना चांदापुरी युनिट एक च्या वतीने कारखान्याचे चेअरमन बाबुराव बोञे पाटील, संचालक  प्रशांत बोञे पाटील यांच्या संकल्पनेतून ऊस उत्पादक शेतकऱ्यांची व कामगारांची  दिवाळी गोङ व्हावी  कारखान्याला  मोफत जे देणे शक्य आहे ते देण्याचा प्रयत्न ओंकार परिवाराचा राहिल या उद्देशाने   ऊसाच्या  प्रमाणात शेतकऱ्यांना मोफत साखर देण्याचे धोरण गेल्या चार वर्षांपासून आहे. या मोफत साखरेच्या कुपनाचे वाटप निमगाव ता माळशिरस येथील शेतकऱ्यांना करण्यात आले. या वेळी शेतकऱ्यांनी या कुपनाचे स्वागत केले. या वेळी सर्जेराव पवार, प्रकाश मगर, बाळासाहेब मगर, रामचंद्र मगर, सुरेंद्र मगर, अशोक मगर, हनुमंत पवार, सचिन मगर, भिकाजी मगर,  विलास पवार, संभाजी साठे, संदीप जाधव व बहुसंख्य ऊस उत्पादक शेतकरी उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या