💢 विधानसभा निवडणुकीची मतमोजणी होणार अकलूजमध्ये 🔵 विधानसभा निवडणुकीची तयारी पूर्ण : विजया पांगारकर

 

💢 विधानसभा निवडणुकीची मतमोजणी होणार अकलूजमध्ये

        🔵 विधानसभा निवडणुकीची तयारी पूर्ण : विजया पांगारकर

वृत्त एकसत्ता न्यूज 

आकाश भाग्यवंत नायकुडे 

मुंबई दिनांक 18/10/ 2024 : विधानसभा निवडणुकीसाठी आवश्यक असणारी सर्व तयारी पूर्ण झाली असून प्रशासन सज्ज असल्याची माहिती उपविभागीय अधिकारी विजया पांगारकर यांनी दिली. अकलूज कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारातील वखार महामंडळाच्या गोडाऊन मध्ये मतमोजणी तसेच स्ट्रॉंग रूमबाबतचा प्रस्ताव आयोगाकडे पाठवला असून तेथे तयारी करण्यात येत आहे.

विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने मतदान केंद्रामध्ये सुसूत्रीकरण करण्यात आले. यामध्ये नवीन सात केंद्रे, सहा मतदार केंद्राच्या नावात बदल तर तीन मतदार केंद्रांच्या स्थानात बदल करण्यात आला आहे. निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार जास्त मतदार असलेल्या मतदान केंद्रातील नावे शेजारील कमी मतदार असलेल्या मतदान केंद्रात टाकण्यात आली असून ७७ मतदान केंद्रांचे विलीनीकरण करण्यात आले आहे. त्यानुसार नागरिकांनी त्याबाबत माहिती घ्यावी असे आवाहन करीत प्रांताधिकारी पांगारकर यांनी  माळशिरस तालुक्यात मतदार नोंदणी अभियान राबवण्यात आले असून महिला व युवकांचे मतदान वाढीवर भर देण्यात आला त्यामुळे ३९६ युवक मतदारांसह सुमारे ३५६६ मतदार वाढले आहेत. शिवाय लिंग गुणोत्तर ९३२वरून ९३७ झाले आहे. माळशिरस तालुक्यात पुरुष १ लाख ७९ हजार ५५८, महिला १ लाख ६८ हजार १९७ इतर ३२ असे एकूण ३ लाख ४७ हजार ७८७ मतदार आहेत. तालुक्यात अजूनही  नव मतदारांची नोंदणी करण्यात येत असून १९ ऑक्टोबर पर्यंत नोंदणी केल्यास त्यांना  विधानसभा निवडणुकीत मतदान करता येणार आहे. तरी मतदारांनी आपली नावे नोंदवावीत असे आवाहन केले.

एक खिडकी योजना

निवडणूक काळात उमेदवारांना विविध परवाने काढणे गरजेचे असून हे परवाने एकाच ठिकाणी मिळावेत यासाठी सार्वजनिक बांधकाम खात्याच्या कार्यालयात एक खिडकी सुरू करण्यात आली असून तेथे सर्व प्रकारचे परवाने देण्याची सोय करण्यात आली आहे.

ठळक बाबी

♦️ माळशिरस तालुक्यात एकही संवेदनशील मतदान केंद्र नाही.

🔵2300 कर्मचारी🟡 इको  फ्रेंडली मतदान केंद्रांची निर्मिती 🟢345 मतदान केंद्रे 🟣125% मशीन 🟡 निवडणूक आयोगाच्या सेफ्टी मेजर मध्ये बसलेने अकलूज कृषी उत्पन्न बाजार समिती आवारातील वखार महामंडळाचे गोडाऊंस मतमोजणी प्रक्रिया आणि मशीन ठेवण्यासाठी स्ट्रॉंग रूम इत्यादी तत्सम बाबीसाठी दहा हजार स्क्वेअर फुट सुरक्षित  जागा उपलब्ध🔴2 हजार ते अडीच हजार पोस्टल बॅलेट पेपर असतील🟠 46 बसेस तर 70 जीप सह अन्य वाहतूक वाहनांचे नियोजन

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या