राज्यस्तरीय मेंढपाळ समितीच्या सदस्यपदी समाज भूषण संजय वाघमोडे नियुक्त

 


राज्यस्तरीय मेंढपाळ समितीच्या सदस्यपदी समाज भूषण संजय वाघमोडे नियुक्त

वृत्त एकसत्ता न्यूज 

आकाश भाग्यवंत नायकुडे 

मुंबई दिनांक 28/10/ 2024 : यशवंत क्रांती संघटनेचे संस्थापक अध्यक्ष समाज भूषण संजय निवृत्ती वाघमोडे यांची राज्यस्तरीय मेंढपाळ समितीच्या सदस्यपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

वनचराई क्षेत्र शेळ्या मेंढ्यांसाठी उपलब्ध करणे, चराई पास देणे, चराईसाठी महसूल व वन विभागाच्या पडीक जमिनी उपलब्ध करून देणे, इतर मागण्या पूर्ण करण्यासाठी पशुसंवर्धन विभाग व उद्योग विभाग यांच्यामार्फत मेंढी पालन व शेळी पालन करण्यासाठी येणाऱ्या अडचणी व मेंढपाळांचे प्रश्न सोडवण्यासाठी एक समिती गठीत करण्यात आली आहे. सदर समितीमध्ये मुख्य सचिव, महसूल अप्पर मुख्य सचिव, वित्त अप्पर मुख्य सचिव, वने अप्पर मुख्य सचिव, पशुसंवर्धन व प्रधान सचिव, बहुजन कल्याण विभाग यांच्या संयुक्त विद्यमानाने स्थापन करण्यात आलेल्या कमिटीमध्ये सदस्यपदी यशवंत क्रांती संघटनेचे संस्थापक अध्यक्ष संजय वाघमोडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्या निवडी चे वृत्त समजल्यापासून सर्व स्तरातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. वर्ल्ड धनगर सोशल ऑर्गनायझेशन राष्ट्रीय सल्लागार समितीचे अध्यक्ष, भारतीय राष्ट्रवादी पार्टी चे राष्ट्रीय सचिव, नॅशनल युनियन बॅकवर्ड एससी एसटी अँड मायनॉरिटीज अर्थात एन यु बी सी दिल्ली चे महाराष्ट्र प्रदेश संपर्कप्रमुख व प्रसिद्धी प्रमुख, सेवाजेष्ठ पत्रकार भाग्यवंत लक्ष्मण नायकुडे यांनी  त्यांचे  अभिनंदन करून भावी समाजसेवा कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या