💢अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना सुट्टी अथवा पोस्टल मतदान करुन घ्यावे.
🟡यशवंत क्रांती चे जिल्हाधिकारी यांना निवेदन
/वृत्त एकसत्ता न्यूज
आकाश भाग्यवंत नायकुडे
मुंबई दिनांक 26/10/ 2024 : अत्यावश्यक सेवेतील आरोग्य कर्मचाऱ्यांरी मतदानापासून वंचित राहू नये यासाठी मतदानादिवशी त्यांना सुट्टी अथवा पोस्टल मतदानाची सुविधा उपलब्ध करून द्यावी अशी मागणी यशवंत क्रांती संघटनेच्या वतीने संघटनेचे संस्थापक अध्यक्ष संजय वाघमोडे यांच्या नेतृत्वाखाली संघटनेच्या शिष्टमंडळाने अमोल येडगे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी कोल्हापूर, एस कार्तिकेयन मुख्यकार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद कोल्हापूर, डॉ.अनिरुध्द पिंपळे यांची भेट घेऊन निवेदन देण्यात आले.
यशवंत क्रांती संघटनेच्या वतीने देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे कि मतदानादिवशी प्रत्येक मतदारास मतदानाचा हक्क बजावता यावा म्हणून शासनाकडून शासकीय निमशासकीय कर्मचाऱ्यांना सुट्टी जाहीर करण्यात येते कि मतदारांना ज्या मतदान केंद्रावर आपले मतदान आहे. त्या मतदान केंद्रावर जावून मतदानाचा हक्क बजावता यावा व ज्या कर्मचाऱ्यांना निवडणूक कामासाठी सहभागी करून घेण्यात येते त्यांना मतदानाचा हक्क बजावता यावा यासाठी त्यांना पोस्टल मतदान करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात येते. परंतु आरोग्य विभागातील अधिकारी,वैद्यकीय अधिकारी, जनसमुदाय आरोग्य अधिकारी, आरोग्यसेवक महिला व पुरुष कर्मचाऱ्यांना अत्यावश्यक सेवा असल्याने सुट्टी देण्यात येत नाही. व प्रत्यक्ष निवडणूक कामगिरीवर नसल्याने पोस्टल मतदान करता येत नाही. मतदान केंद्रावर उपस्थित राहण्याच्या सक्त सुचना असल्याने कार्यक्षेत्राबाहेर जाता येत नसल्याने मतदानाचा हक्क बजावता येत नाही त्यामुळे सदर कर्मचारी हे मतदानापासून वंचित राहतात तसेच त्यांना मतदान केंद्रात ड्युटी नसल्याने त्यांना पोस्टल मतदानाचा अधिकारही मिळत नाही.
एका बाजूस शासन मतदानाचा टक्का वाढावा व मतदान करण्याबाबत मतदारांच्यांत जागरूकता निर्माण करण्यासाठी विविध माध्यमातून जाहिरातीच्या माध्यमातून प्रबोधन करत आहे. परंतु आपल्याच शासकीय कर्मचाऱ्यांना मतदानापासून वंचित ठेवत आहे. तरी आपण निवेदनाची दखल घेऊन मतदान दिवशी मतदान केंद्रात व मतदान केंद्राच्या बाहेर प्रत्यक्ष- अप्रत्यक्ष मतदान प्रक्रियेत सहभागी असणाऱ्या सर्व आरोग्य कर्मचाऱ्यांना पोस्टल मतदानाचा अधिकार देण्यात यावा. किंवा आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांना मतदानाच्या दिवशी सुट्टी जाहीर करून कार्यक्षेत्राबाहेर जाण्याची परवानगी द्यावी. म्हणजे ते आपल्या मतदान केंद्रावर जाऊन आपला मतदानाचा सुद्धा हक्क बजावतील यामुळे मतदानाचा टक्काही वाढेल.
कृपया आपण संबंधित विभागांना तसे आदेश काढून आरोग्य कर्मचारी मतदान करण्यापासून वंचित राहणार नाहीत याबाबत दक्षता घ्यावी हि विनंती शिष्टमंडळात संघटनेचे संस्थापक अध्यक्ष संजय वाघमोडे, शाहुवाडी तालुका अध्यक्ष संजय डफडे, जयवंत बरागडे, बबन यडगे, बाबु डफडे, गंगाराम झोरे, निवेदनाची प्रत राज्य मुख्य निवडणूक अधिकारी यांनाही पाठवण्यात आली आहे. जिल्हाधिकारी अमोल येडगे साहेब यांनी संघटनेच्या शिष्टमंडळाबरोबर झालेल्या चर्चेत याबाबत निर्णय घेऊन लवकरच सबंधित विभागांना आदेश देण्यात येतील असे सांगितले संघटनेचे अध्यक्ष संजय वाघमोडे यांनी सांगितले.
0 टिप्पण्या