💢 आनंदमूर्ति मित्र मंडळ अकलूज च्या वतीने शिखर शिंगणापुरात श्रीशिवशक्ति महारुद्र अभिषेक महापुजा व महाआरती
🟡 शिखर शिंगणापुरातील श्री शंभू महादेवाच्या शिवालयात भुजंगरूपात सर्परूप दर्शन
वृत्त एकसत्ता न्यूज
आकाश भाग्यवंत नायकुडे
मुंबई दिनांक 27/10/ 2024 : गुरुपुष्यामृत योग , कालाष्टमी औचित्य साधून "आत्मोउद्धारत्मक तसेच सर्व संकट निवारणार्थ व उत्तम पर्जन्य , पीक पाणी व उत्तम आरोग्य विषयक संकल्पातून" शिखर शिंगणापुर येथे मोठ्या महादेवास अकलूज येथील आनंदमूर्ती मित्र मंडळाच्या वतीने श्रीशिवशक्ति महारुद्र अभिषेक महापुजा व महाआरती इत्यादी धार्मिक कार्यक्रम राबविण्यात आला.
तसेच श्री अमृतेश्वर मंदिर(बळी मंदिर) येथे अन्नपूजा म्हणजेच सांत्वन पूजा व शिव आराधना , ध्यान-साधन , नामस्मरण , गीत-गायन , आरती आणि महाप्रसाद वाटप इत्यादी संपन्न झाले.
आनंदमूर्ति मित्र मंडळ हे प्रत्येक श्रावणातील शेवटच्या सोमवारी अकलाई घाट अकलूज या ठिकाणी शिवशक्ति यांची सायंकाळी ०९:०० ते रात्री १२:०० या वेळेत महापुजा करत असते. गुरुवारी मंडळाने यशस्वीरित्या २५ व्या वर्षात पदार्पण केले आहे. महादेवाची पूजा करत असताना विविध अनुभव येत होते. सर्वानी उत्तम असा प्रतिसाद देत कार्यक्रम उत्साहामधे पार पडला. कार्यक्रमाच्या उत्तरार्धात भुजंगरूपात सर्परूप दर्शन दिले.





0 टिप्पण्या