💢 सहकार महर्षि शंकरराव मोहिते-पाटील सहकारी साखर कारखान्याचा 63 वा बॉयलर अग्नी प्रदिपन समारंभ संपन्न... 🟪 गळीत हंगाम 2024-25 मध्ये 9 लाख मे.टन ऊस गाळप करण्याचे उद्दिष्ठ

 

💢 सहकार महर्षि शंकरराव मोहिते-पाटील सहकारी साखर कारखान्याचा 

63 वा बॉयलर अग्नी प्रदिपन समारंभ संपन्न...

🟪 गळीत हंगाम 2024-25 मध्ये 9 लाख मे.टन ऊस गाळप करण्याचे उद्दिष्ठ

 वृत्त एकसत्ता न्यूज 

आकाश भाग्यवंत नायकुडे 

मुंबई दिनांक 24/10/ 2024 :

 सहकार महर्षि शंकरराव मोहिते-पाटील सहकारी साखर कारखान्याचा सन    2024-25 चा 63 वा बॉयलर प्रदिपन समारंभ गुरूवार दि.24/10/2024 रोजी सकाळी 10.00 वाजता कारखान्याचे चेअरमनसाहेब जयसिंह शंकरराव मोहिते-पाटील यांचे शुभहस्ते संपन्न झाला. 

    सदर बॉयलर प्रदिपन समारंभानिमित्त दिवशी सकाळी 8:45 वाजता श्रीसत्यनारायण महापूजा कारखान्याचे संचालक रामचंद्र बाबा ठवरे व त्यांच्या सुविद्य पत्नी सौ.कुसुम रामचंद्र ठवरे या उभयतांचे शुभहस्ते संपन्न झाली. 

    कारखान्याने चालू गळीत हंगाम 2024-25 मध्ये 9 लाख मे.टन ऊस गाळप करण्याचे उद्दिष्ठ ठेवलेले आहे. त्यासाठी सर्व मशिनरीच्या ट्रायल्स पुर्ण झालेल्या असून प्रतिदिवशी 8,500 मे. टनापेक्षा जास्त ऊस गाळप करण्यासाठी यंत्रप्रणाली कार्यान्वीत केली आहे. त्यानुसार ऊस तोडणी व वाहतूक यंत्रणा भरलेली असून कारखान्याचे सर्व सभासद व बिगर सभासद यांनी नोंदीचा व बिगर नोंदीचा सर्व ऊस कारखान्यास देऊन सहकार्य करावे असे आवाहन करून मागील गळीत हंगाम 2023-2024 मध्ये गळीतास आलेल्या ऊसाकरीता ठरलेल्या धोरणाप्रमाणे अनुदानाची रक्कम ऊस पुरवठादार शेतकरी यांचे खातेवर जमा केली असून व परंपरेप्रमाणे कारखाना कर्मचारी यांना बोनस देण्यात आला असल्याचे कारखान्याचे कार्यकारी संचालक राजेंद्र चौगुले यांनी सदर प्रसंगी सांगितले.

याप्रसंगी कारखान्याचे व्हाईस चेअरमन शंकरराव माने-देशमुख, संचालक लक्ष्मण शिंदे, नानासाहेब मुंडफणे, विजयकुमार पवार, रामचंद्र सिद, विराज निंबाळकर, रावसाहेब पराडे, भिमराव काळे, गोविंद पवार, तज्ञ संचालक- प्रकाशराव पाटील, रामचंद्रराव सावंत-पाटील, संचालिका सुजाता शिंदे, कार्यलक्षी संचालक-रणजित रणनवरे, शिवसृष्टी किल्ला व शिवछत्रपती मल्टिमेडीया लेजर शो कमिटी संचालक - पांडूरंग एकतपुरे, बाळासाहेब माने-देशमुख, विनायक केचे, राजेंद्र भोसले, अमृतराज माने-देशमुख, धनंजय सावंत, नामदेव चव्हाण, अनिलराव कोकाटे, श्रीकांत बोडके, सौ.हर्षाली निंबाळकर, माजी संचालक- भिमराव काळे, केशव ताटे, सुभाष पताळे, शिवाजीराव सिद, राजेंद्र मोहिते, महादेवराव घाडगे, विजय माने-देशमुख, रामचंद्र चव्हाण, नितीन निंबाळकर तसेच सभासद, खातेप्रमुख, कामगार, कामगार व युनियन प्रतिनिधी उपस्थित होते.



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या