सद्गुरु श्री श्री कारखान्याने प्रति टन रुपये 150 प्रमाणे ऊस बिल शेतकऱ्यांच्या खात्यावर आज जमा केले - चेअरमन एन.शेषागिरी राव

 

सद्गुरु श्री श्री कारखान्याने प्रति टन रुपये 150 प्रमाणे ऊस बिल शेतकऱ्यांच्या खात्यावर आज जमा केले - चेअरमन  एन.शेषागिरी राव 

वृत्त एकसत्ता न्यूज 

पिलीव / रघुनाथ देवकर

दिनांक 29/10/ 2024 : सांगली सातारा व सोलापूर जिल्ह्याच्या सरहद्दीवर सद्गुरु श्री श्री रविशंकर महाराज (गुरूजी) यांच्या कृपाशीर्वादाने उभा राहिलेल्या व विकासात्मक वाटचाल करीत असलेल्या सद्गुरू साखर कारखान्याच्या व्यवस्थापनाने गळीत हंगाम 23 - 24 मध्ये गळीतास आलेल्या सर्व ऊस उत्पादकांना दीपावली सणानिमित्त न मागता सभासदांची दीपावली गोड करण्याकरता प्रति टन रुपये 150 प्रमाणे ऊस बिल शेतकऱ्यांच्या खात्यावर आज जमा केले आहे अशी माहिती कारखान्याचे चेअरमन  एन.शेषागिरी राव   यांनी आज दिली. यावेळी कारखान्याचे व्हाईस चेअरमन बाळासाहेब कर्णवर पाटील उपस्थित होते.

सर्व सभासद बंधूंना त्यांनी या ठिकाणी दीपावलीच्या शुभेच्छा देत असतानाच सद्गुरु साखर कारखान्याप्रती कायमस्वरूपी विश्वास ठेवून आपला ऊस सद्गुरु साखर कारखान्याकडे संपूर्णपणे द्यावा अशी आशा व्यक्त केली व सद्गुरु साखर कारखाना सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या हिताचाच सुरुवातीपासून विचार करीत असताना वजन काटा पारदर्शकता, राजकारण विरहित कामकाज व गळीतास आलेल्या ऊसास प्रत्येक वर्षी चाचणी हंगामापासून एफआरपी पेक्षा जादा दर देणारा कारखाना हा नावलौकिक कायम ठेवण्याचे काम व्यवस्थापनाने कारखाना उत्कृष्टपणे व काटकसरीने चालवून  सद्गुरु परिवार सभासदांच्या आर्थिक समृद्धी बरोबरच आरोग्यपूर्ण आयुष्य व सुखी जीवन जगण्यासाठी आर्ट ऑफ लिविंग च्या माध्यमातून कायमस्वरूपी कामकाज करत असून पुढेही करणार आहे असे आवर्जून सांगितले तसेच सद्गुरु साखर कारखान्याने कधीही ऊस उत्पादक शेतकऱ्यांमध्ये सभासद व बिगर सभासद असा भेदभाव ऊस दर देताना कधीही केलेला नाही असे आवर्जून सांगितले

सर्व सभासदांनी इतर कारखाने पन्नास, किंवा शंभर रुपये ज्यादा दर देतात म्हणून त्यांच्याकडे ऊस न घालता आपण गेले बारा हंगामामध्ये मिळालेल्या दराचा विचार करावा व सद्गुरु साखर कारखान्याबरोबर आपली बांधिलकी व विश्वासहर्ता कायम ठेवावी अशी विनंती केली. यावेळी कारखान्याचे मॅनेजिंग डायरेक्टर उदयसिंह जाधव सर्व खाते प्रमुख व अधिकारी उपस्थित होते

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या