दानोळीत सुरू असलेल्या धरणे आंदोलनाला यशवंत क्रांती संघटनेचा पाठिंबा

 

दानोळीत सुरू असलेल्या धरणे आंदोलनाला यशवंत क्रांती संघटनेचा पाठिंबा 

अकलूज वैभव न्यूज नेटवर्क/ वृत्त एकसत्ता न्यूज

पेठवडगाव प्रतिनिधी दिनांक 25/9/2024 :  दानोळी (ता. शिरोळ) येथे गेल्या वीस दिवसां पासून "आंदोलन अंकुश संघटनेच्या" वतीने सुरू असलेल्या धरणे आंदोलनाला यशवंत क्रांती संघटनेने पाठिंबा दिला.

राज्यातील साखर कारखान्यांकडून  उसाची तोडणी,वाहतूक सरासरीच्या अंतराने न आकारता किलोमीटरने आकारण्यात यावी.व येथील डोंगर पायथ्याशी असलेला बंधारा पावसामुळे वाहून गेल्याने,येथे नवीन आरसीसी बंधारा बांधण्यात यावा. या मागणीसाठी आंदोलन अंकुश कडून बेमुदत धरणे आंदोलन सुरू आहे.या पार्श्वभूमीवर रविवारी कोल्हापूर जिल्हा यशवंत क्रांती संघटनेकडुन धरणे आंदोलनास पाठिंबा देण्यात आला."आंदोलन अंकुश संघटनेच्या"  मागण्या शेतकरी हिताच्याफ असल्याने,यशवंत क्रांती संघटने कडून आंदोलनास पाठिंबा देत असल्याचे अध्यक्ष संजय वाघमोडे यांनी सांगितले. यावेळी आंदोलकांना पाठिंब्याचे पत्र देण्यात आले.



यावेळी आंदोलन अंकुश चे उदय होगले, बंडू होगले, दत्ता जगदाळे, सुनील बाबर,प्रमोद बाबर,विजय दळवी आदींसह जिल्हा उपाध्यक्ष दादासो गावडे, जिल्हा संघटक पिंटू गावडे, सचिन भानुसे, पांडुरंग गावडे, अनिल गावडे, विजय गावडे, विजय सिद्ध,निवास कोळेकर उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या