💢 सहकार महर्षि कारखान्याची वार्षिक सर्वसाधारण सभा खेळी मेळीत संपन्न
🟪सभासदांनी जास्तीत जास्त ऊस गाळपासाठी देऊन सहकार्य करावे : अध्यक्ष जयसिंह मोहिते पाटील
अकलूज वैभव न्यूज नेटवर्क/वृत्त एकसत्ता न्यूज
आकाश भाग्यवंत नायकुडे
मुंबई दिनांक27/9/ 2024 : आपल्या सहकार महर्षि कारखान्याने या हंगामात नऊ लाख मे.टन ऊस गळीताचे उद्दिष्ट ठेवले असून सभासदांनी जास्तीत जास्त ऊस गाळपास देऊन सहकार्य करावे असे आवाहन चेअरमन जयसिंह मोहिते पाटील यांनी वार्षिक सर्वसाधारण सभेत बोलताना केले.
शंकरनगर अकलूज (तालुका माळशिरस, जिल्हा सोलापूर) येथील सहकार महर्षि शंकरराव मोहिते पाटील सहकारी साखर कारखान्याची ६४ वी विधिमंडळ वार्षिक सर्वसाधारण सभा अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली. यावेळी माजी उपमुख्यमंत्री व कारखान्याचे मार्गदर्शक संचालक विजयसिंह मोहिते-पाटील, खासदार धैर्यशील मोहिते-पाटील, संचालिका स्वरूपाराणी मोहिते-पाटील, अर्जुनसिंह मोहिते पाटील, व्हाईस चेअरमन शंकरराव माने-देशमुख, माजी उपाध्यक्ष रामचंद्र सावंत पाटील, प्रताप पाटील, आजी-माजी संचालक, कार्यकारी संचालक राजेंद्र चौगुले, विविध संस्थांचे पदाधिकारी व सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कारखान्याचे चेअरमन जयसिंह मोहिते पाटील पुढे म्हणाले, सहकार महर्षि कारखान्याने सभासद व कारखान्याच्या हिताचे निर्णय घेतले, ऊस विकास, ठिबक सिंचन आदी कार्यक्रम राबवले. त्याचबरोबर दुष्काळात पाणीवाटप, कोरोना काळात मदत असे अनेक सामाजिक उपक्रम राबविले असल्याचे सांगत सध्या कारखाना फायद्यात आहे. ज्यादा ऊस दर देऊन कारखाना मोडीत काढण्यापेक्षा सहकारी साखर कारखाना सुस्थितीत टिकावा यासाठी योग्य नियोजन करून चांगला दर देणार असून अजून दोन वर्षानंतर कारखाना एकदम सुस्थितीत जाणार आहे असल्याचे सांगितले.
यावेळी एकरी ज्यादा ऊसउत्पादन घेणाऱ्या सभासदांचा प्रशस्तीपत्र व रोख रक्कम देऊन गौरव करण्यात आला. आभार डॉ. सुभाष कटके यांनी मानले.
0 टिप्पण्या