सूक्ष्मजीवशास्त्र विषयावरील आंतरराष्ट्रीय परिषदेमध्ये गृहविज्ञान महिला महाविद्यालयाच्या विद्यार्थिनींचे यश
अकलूज वैभव न्यूज नेटवर्क/वृत्त एकसत्ता न्यूज
आकाश भाग्यवंत नायकुडे
मुंबई दिनांक 30/9/ 2024 : शिक्षण प्रसारक मंडळ अकलूज( तालुका माळशिरस जिल्हा सोलापूर) संचलित श्रीमती रत्नप्रभादेवी मोहिते पाटील गृहविज्ञान महिला महाविद्यालयाच्या एकूण सात विद्यार्थिनिंनी गुवाहाटी विद्यापीठ, गुवाहाटी, रंगपारा कॉलेज, गुवाहाटी व ग्लोबल इंडिया फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या सूक्ष्मजीवशास्त्र विषयावरील आंतरराष्ट्रीय परिषदेमध्ये सहभागी होऊन शोध निबंधाचे सादरीकरण केले. यापैकी तीन विद्यार्थिनींना परिषदेमध्ये उत्कृष्ट शोधनिबंध सादरीकरणासाठी पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. यामध्ये प्रथम क्रमांक कु. अमृता बाळासो मगर, द्वितीय क्रमांक कु. सोनाली विलास सावंत व तृतीय क्रमांक कु. वैष्णवी जोतीराम माने यांनी पटकाविला.
विद्यार्थिनींनी मिळविलेल्या यशाबद्दल महाविद्यालय विकास समितीच्या अध्यक्षा कु. स्वरूपाराणी मोहिते पाटील, प्रभारी प्राचार्य डॉ. राहुल सुर्वे, सर्व प्राध्यापक व कार्यालयीन कर्मचारी यांनी कौतुक केले. विज्ञान विभागाचे प्रमुख डॉ. अमित घाडगे यांचे मार्गदर्शन लाभले.

0 टिप्पण्या