💢अकलूजमध्ये सुशीलकुमार शिंदे यांचा वाढदिवसानिमित्त नागरी सत्कार
●महाराष्ट्रातील सर्वपक्षीय नवनिर्वाचित खासदारांचाही होणार सन्मान
अकलूज वैभव न्यूज नेटवर्क/ वृत्त एकसत्ता न्यूज
आकाश भाग्यवंत नायकुडे
मुंबई दिनांक28/9/2024 : सोलापूर जिल्ह्यातील अकलूज येथील विजयसिंह मोहिते पाटील क्रीडा संकुलवर माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या ८४ व्या वाढदिवसानिमित्त नागरी सत्कार तसेच महाराष्ट्रातील सर्व नवनिर्वाचित खासदारांचा पक्षविरहित सन्मान सोहळा रविवार दिनांक 29 सप्टेंबर रोजी होणार असल्याची माहिती खा. धैर्यशिल राजसिंह मोहिते पाटील यांनी पत्रकार परिषदेत सांगितली.
अकलूज येथील विजयसिंह मोहिते पाटील क्रीडा संकुलवर होणाऱ्या या सत्कार सोहळ्यात ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्तच्या अभिष्टचिंतन सोहळ्या बरोबरच महाराष्ट्रातील सर्वपक्षीय नवनिर्वाचित खासदारांना निमंत्रित केले असून या सर्व नवनिर्वाचित खासदारांचा सन्मान करण्यात येणार आहे. हा सोहळा वाढदिवसानिमित्त अभिष्टचिंतन व नवनिर्वाचित खासदारांचा सन्मान सोहळा असल्याने यामध्ये कोणताही राजकीय पक्ष प्रवेश होणार नसल्याचे खासदार मोहिते पाटील यांनी स्पष्ट केले.
हा सोहळा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष, ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या उपस्थितीत, काँग्रेसचे विधीमंडळ पक्षनेते बाळासाहेब थोरात यांच्या अध्यक्षतेखाली व माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे. या सोहळ्यास राज्यभरातील अनेक नेते मंडळी, इतर मान्यवर व्यक्ती उपस्थित राहणार असल्याचे खासदार मोहिते पाटील यांनी सांगितले.
विजयसिंह मोहिते पाटील क्रीडा संकुलवर तयारी...
या सत्कार समारंभासाठी विजयसिंह मोहिते पाटील क्रीडा संकुल वर भव्य मंडप टाकण्यात आला असून सुमारे पन्नास हजार प्रेक्षकांसाठी बैठक व्यवस्था करण्यात येत आहे. राज्यातील सर्वपक्षीय नवनिर्वाचित खासदारांसाठी पक्ष विरहित आयोजित करण्यात आलेला हा सन्मान सोहळा एकमेव ठरणार असल्याची चर्चा सुजाण नागरिकांमधून होत आहे.
0 टिप्पण्या