गृहविज्ञान महिला महाविद्यालयाचे युवा महोत्सवात यश

 

गृहविज्ञान महिला महाविद्यालयाचे युवा महोत्सवात यश

अकलूज वैभव न्यूज नेटवर्क/वृत्त एकसत्ता न्यूज 

आकाश भाग्यवंत नायकुडे 

मुंबई दिनांक27/9/ 2024 : शिक्षण प्रसारक मंडळ अकलूज (तालुका माळशिरस जिल्हा सोलापूर) संचलित श्रीमती रत्नप्रभादेवी मोहिते पाटील गृहविज्ञान महिला महाविद्यालयाने एसएनडीटी महिला विद्यापीठ आयोजित वार्षिक युवा महोत्सवात घवघवीत यश संपादन केले आहे. एसएनडीटी महिला विद्यापीठाने दिनांक 21.9.2024 रोजी माटुंगा (मुंबई) येथील एम एम पी शहा कला व वाणिज्य महाविद्यालयात वार्षिक युवा महोत्सवाचे आयोजन केले होते. सदर युवा महोत्सवात अंतिम फेरीतील  स्पर्धेत साहित्य या श्रेणीत  कु. अमृता बाळासाहेब मगर हिने मराठी कविता सादरीकरण स्पर्धेत तृतीय व मराठी वकृत्व स्पर्धेत द्वितीय क्रमांक पटकाविला. कु. जागृती लक्ष्मण ऐवळे हिने हिंदी वक्तृत्व स्पर्धेत  द्वितीय क्रमांक पटकावला. या स्पर्धेचे बक्षीस वितरण समारंभ सेवा मंडळ शैक्षणिक सोसायटीचे चेअरमन  प्रवीण भाई शहा तसेच प्रमुख पाहुण्या गुजरात राज्याच्या स्टेट टॅक्स इन्स्पेक्टर  सौ. तरुणा युवराज परमार यांच्या हस्ते पार पडला. सदर विद्यार्थिनिंनी मिळविलेल्या यशाबद्दल महाविद्यालय विकास समितीच्या अध्यक्षा कु. स्वरूपाराणी जयसिंह मोहिते पाटील यांनी अभिनंदन केले. तसेच महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. राहुल सुर्वे, सर्व प्राध्यापक व प्राध्यापकेतर कर्मचारी यांनीही अभिनंदन केले. विविध स्पर्धांमध्ये महाविद्यालयाच्या एकूण सहा विद्यार्थिनींनी सहभाग नोंदविला होता. या स्पर्धेतील सहभागी विद्यार्थिनींना सांस्कृतिक विभाग प्रमुख डॉ. छाया भिसे यांचे  मार्गदर्शन लाभले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या