रानभाजी - कडूकंद
अकलूज वैभव न्यूज नेटवर्क/वृत्त एकसत्ता न्यूज
संग्राहक : प्रविण सरवदे/ आकाश भाग्यवंत नायकुडे
अकलूज दिनांक26/9/ 2024 : जंगलातील आदिवासी भागात कडूकंदाच्या वेली बऱ्याच झाडावर दिसतात. त्याची पाने पिंपळाच्या पानाच्या आकाराची असतात. या वेलीला जमीनी मध्ये कंद लागतो. तो चवीला खुपच कडू असतो.
उपयोग
कडूकंद हा चवीला कडू असतो. त्या कंदाला उकडवून त्याच्या चकल्या पाडून त्यांना वाहत्या ओहोळात किंवा नाल्या मध्ये रात्रभर बुडवून ठेवले जाते. त्यामुळे त्याचा कडूपणा जाऊन त्या चवीला निवळतात. सकाळी त्यामध्ये मीठ टाकून शिजवले जाते. त्याचा नास्तासाठी आदिवासी भागात वापर केला जातो. तसेच या कंदाच्या वळी खाणे आरोग्यासाठी फायदेशीर असते.
ओळख
वेलीची पाने बघून मुळा जवळील कंद काढता येतात. पानांचा देठाची चव घेतल्यास कडू लागते.
संदर्भ : इंटरनेट
संकलन : मिलिंद पंडित, कल्याण
0 टिप्पण्या