गृहविज्ञान महिला महाविद्यालयाचा पोषण माह जनजागृती कार्यक्रम अंगणवाडी सहकारनगर येथे संपन्न
अकलूज वैभव न्यूज नेटवर्क/वृत्त एकसत्ता न्यूज
आकाश भाग्यवंत नायकुडे
मुंबई दिनांक27/9/ 2024 : अकलूज ( तालुका माळशिरस जिल्हा सोलापूर) येथील श्रीमती रत्नप्रभादेवी मोहिते पाटील गृहविज्ञान महिला महाविद्यालयाचा राष्ट्रीय सेवा योजना विभाग व अंगणवाडी अकलूज माळीनगर बीट-2 यांच्या संयुक्त समन्वयाने दिनांक 26/09/2024 रोजी पोषण माहनिमित्त पोषण जनजागृती कार्यक्रम सहकारनगर येथील अंगणवाडीमध्ये आयोजित करण्यात आला होता . या उपक्रमाअंतर्गत महाविद्यालयातील द्वितीय वर्षाच्या विद्यार्थिनींनी विविध पोषण विषयक माहितीपूर्ण पोस्टर्स तयार केले होते. तसेच विद्यार्थिनींनी विविध पौष्टिक पदार्थ तयार करून ते प्रदर्शनात ठेवले. गर्भवती महिला व स्तनदा मातेचा एक दिवसाचा आहार नियोजन करून तो मांडण्यात आला होता. विद्यार्थिनींनी या उपक्रमामध्ये सहभागी झालेल्या सर्व माता, प्रौढ स्त्रिया, अंगणवाडी सेविका, मदतनीस व आशा वर्कर यांना पोषक आहार, पोषणाअभावी होणारा रक्तक्षय, पोषकतत्व सुरक्षित करण्याचे उपाय, विविध वयोगटासाठी पौष्टिक खाद्यपदार्थ व अन्नपदार्थ याविषयीची माहिती पोस्टरच्या माध्यमातून दिली. तसेच विविध पौष्टिक खाद्यपदार्थ, त्यांचे आरोग्यातील महत्त्व, पदार्थ तयार करण्याची पद्धती याविषयी सविस्तरपणे माहिती देण्यात आली. तेथे उपस्थित सर्व सहभागींनी विद्यार्थिनींनी बनवलेल्या विविध पौष्टिक खाद्यपदार्थांचा आस्वाद घेतला. या जनजागृती कार्यक्रमांमध्ये महाविद्यालयाच्या अन्न व पोषण शास्त्र विभागाच्या प्रा. डॉ. भारती भोसले व डॉ. जयशीला मनोहर यांनी पोषक आहार याविषयी मार्गदर्शनपर व्याख्यान दिले. तसेच विद्यार्थिनींनी पोस्टर्सच्या माध्यमातून पर्यावरण संवर्धनाविषयी जनजागृती केली. या जनजागृती कार्यक्रमांमध्ये अकलूज माळीनगर बीट-2 च्या अंगणवाडी सेविका, मदतनीस तसेच आशा वर्कर, माता व प्रौढ स्त्रिया यांनी सहभाग नोंदविला. तसेच सेवा ही स्वच्छता या उपक्रमांतर्गत विद्यार्थिनींनी अंगणवाडीच्या परिसराची स्वच्छता केली. महाविद्यालय विकास समितीच्या अध्यक्षा कु. स्वरूपाराणी मोहिते पाटील यांच्या प्रेरणेतून या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमासाठी महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. राहुल सुर्वे यांनी मार्गदर्शन केले. राष्ट्रीय सेवा योजनेच्या कार्यक्रमाधिकारी डॉ. भारती भोसले यांनी या उपक्रमासाठी विद्यार्थिनींना मार्गदर्शन केले . तसेच श्रीमती सुनिता काटे, रमजान शेख व दीपक शिंदे यांनी सदर उपक्रमासाठी परिश्रम घेतले.
0 टिप्पण्या