रानभाजी - जिवती ची फुले
शास्त्रीय : Telosma pallida
कुळ : Apocynaceae
इंग्रजी : Telosma vine
स्थानिक : ज्योती,दौडी,वसू,झुटेल
अकलूज वैभव न्यूज नेटवर्क/वृत्त एकसत्ता न्यूज
संग्राहक : प्रविण सरवदे/ आकाश भाग्यवंत नायकुडे
अकलूज दिनांक27/9/ 2024 : पहिला पाऊस पडताच जिवतीच्या फुलाच्या वेलीला बहर येतो. नैसर्गिकरित्या ही वनस्पती जंगलात झाडाझुडुपावर किंवा काटेरी झाडावर वाढतात. या वेलीच्या फुलांची भाजी करतात, जी आरोग्यासाठी उपयुक्त आहे. यांच्या उपलब्धीचा काळ हा जुलै ते सप्टेंबर महिना असतो.
पोषकतत्वे
# जिवतीच्या फुला मध्ये जीवनसत्व-अ, लोह, कॅल्शिअम, तंतुमय पदार्थ, सोडियम व पोटॅशियम असते. # डोळ्यांच्या आरोग्याकरिता फायदेशीर. # लोह रक्त निर्मिती करीता आवश्यक. # हाडे व दातांना मजबुती देते. # सोडिअम शरीराला आवश्यक असणारे पाचक रसायनाची निर्मिती करतात. # पोटॅशियम यकृत यांना सुरळत ठेवण्याचं कार्य करतं.
औषधी गुणधर्म
खोकला, सर्दी आणि दम्याचा उपचार करण्यासाठी जिवतीच्या फुलांचा वापर केला जातो. त्वचेच्या रोगा मध्ये भाजीचे सेवन फायदेशीर आहे.
पाककृती : फुलांची भाजी १
जवस किंवा शेंगदाणा तेल तव्यावर टाकून त्यात जिरे, भरपूर कांदा, खुडलेल्या हिरव्या मिरच्या, खुडलेला लसूण व हळद, कडीपत्त्याची फोडणी करतात. फोडणी झाल्यावर फुले व मीठ टाकून शिजवतात. ही भाजी फार लवकर शिजते अगदी ३-४ मिनिटात. ज्वारीच्या भाकरी बरोबर भाजी रुचकर लागते.
पाककृती : फुलांची भाजी २
# साहित्य - १ पाव जिवतीचे फुलं, २ कांदे, ३-४ लाल मिरच्या, तेल, हळद, धनेपूड, मीठ, जिरे, मोहरी.
# कृती - प्रथम फुलं निवडुन, धुवून कट करून घ्यायची. कांदा मिरची कट करून घ्यायची. गॅसवर कढई ठेवून तेल गरम करून घ्यायचं. जिरे ,मोहरी घालून कांदा, मिरची घालून परतुन घ्यायचं. आता हळद, धनेपुड, मीठ घालून परतुन घ्यायचं. आता फुलं टाकून परतून घ्यायचं. पाच मिनीट शिजवायचे. जिवतीच्या फुलांची भाजी तयार झाली. पोळी किवा भाकरी सोबत सर्व्ह करू शकता.
संदर्भ : फेसबुक
संकलन : मिलिंद पंडित, कल्याण
0 टिप्पण्या