अकलूज वैभव न्यूज नेटवर्क/वृत्त एकसत्ता न्यूज
आकाश भाग्यवंत नायकुडे
मुंबई दिनांक 16/9/ 2024 : हाडांच्या व मणक्यांच्या आजारावर संपुर्ण भारतात सुप्रसिध्द असलेल्या पुणे येथील संचेती इन्स्टिट्युट फॉर आर्थोपेडिक्स ॲन्ड रिहॅबीलीटेशन म्हणजेच संचेती हॉस्पिटल व अकलूज येथील प्रसिध्द डॉ. एम. के. इनामदार यांच्या अश्विनी हॉस्पिटल यांचे यंयुक्त विद्यमाने दि.२२ सप्टेंबर २०२४ रोजी भव्य अस्थिरोग व मणके विकार निदान आणि उपचार शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे.
बदलती जिवनशैली आणि कोरोना नंतर वाढलेले हाडांचे दुखणे, त्यावरील उपचार याची माहिती रुणांना व्हावी या ऊद्देशाने सदर भव्य शिबीराचे अयोजन करण्यात आले आहे.
हे शिबीर रविवार दि.२२ सप्टेंबर २०२४ रोती सकाळी ८ ते दुपारी १ यावेळेत अकलुज येथिल डॉ. एम. के इनामदार यांच्या अश्विनी हॉस्पिटल मध्ये पार पडणार आहे.
या शिबीरामध्ये संचेती हॉस्पिटलचे डॉ. पराग संचेती यांचसह तज्ञांचे संपुर्ण पथक सहभागी होवुन रुणांची तपासणी व ऊपचार करणार आहेत. शिबीरामध्ये सांधे दुखी, मणक्यांचे जुने आजार, संधीवात, डायवेटिक न्युरोपॅथी, हातापायांना मुंग्या येणे, सायटीका पेन, कंबर दुखणे, लिगामेंट इंज्युरी, सांधे प्रत्यारोपन, टेनीस एल्वो, फ्रोजन शोल्डर, हिप व नी रिप्लेसमेंट नंतरचे उपचार करण्यात येणार आहेत. त्याचप्रमाणे हाडांचा ठिसुपणा (बी.एम.डी.) या आजाराचीही मोफत तपासणी करण्यात येणार असल्याचे आयोजकांनी सांगितले आहे.
शिबीर मोफत पण नाव नोंदणी गरजेची
सदरचे शिबीर हे पुर्णपणे मोफत आहे, मात्र त्यासठी रुग्णांची नाव नोंदणी अनिवार्य असणार आहे. रुग्णांनी येताना पुर्वी ऊपचार केलेले केसपेपर व एक्स-रे बरोबर घेवुन येणे गरजेचे आहे. शिबीरासाठी नाव नोंदणी प्रक्रिया सुरु झाली असुन नाव नोंदणीसाठी ७७७४०२४१२९ या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन ही आयोजकांनी केले आहे.

0 टिप्पण्या