यशवंत क्रांती संघटनेमुळे मेंढपाळ बिरु अनुसे यांना वनविभागाकडुन मिळाली ६७ हजार १२१ रुपये नुकसान भरपाई
अकलूज वैभव न्यूज नेटवर्क/ वृत्त एकसत्ता न्यूज
पेठ वडगाव प्रतिनिधी दिनांक 25/9/2024 : तरसदृश्य वन्यप्राण्यांनी केलेल्या हल्ल्यात ठार झालेल्या शेळ्यांच्या भरपाई पोटी वनविभागाकडुन बिरु सयाप्पा अनुसे यांच्या खात्यावर ६७ हजार १२१रुपये जमा करण्यात आले. यासाठी यशवंत क्रांती संघटनेच्या माध्यमातून पाठपुरावा करण्यात आला होता.
याबाबत सविस्तर माहिती अशी की बिरू अनुसे,सयाप्पा शिवाजी अनुसे, बिरू भीमराव अनुसे, रा. बु. वठार, युवराज बंडगर, खोची,ता. हातकणंगले जि. कोल्हापूर, या सर्व मेंढपाळांचा शेळ्या मेंढ्यासह खतासाठी बागणी येथील शेतकरी भिमराव कृष्णा मोटे यांच्या बागणी ढवळी वाटेवर भुमापन क्र. ४७/२ब/१ नंबरच्या शेतात बसायला असताना मंगळवार दिनांक ९/१/२०२४ रोजी रात्री तरसदृश्य वन्यप्राण्यांनी केलेल्या हल्ल्यात ९ शेळ्यांची कोकरे ठार तर ६ बेपत्ता झाली होती. या घटनेमुळे अतिशय गरीब परिस्थिती असलेले मेंढपाळ बिरु सयाप्पा अनुसे खचून गेले
हल्ल्याची घटना मेंढपाळ बिरू अनुसे यांनी यशवंत क्रांती संघटनेचे संस्थापक अध्यक्ष संजय वाघमोडे यांना फोनवरून कळवली संजय वाघमोडे यांनी ही घटना वनाधिकारी व पशुसंवर्धन अधिकारी यांना तत्काळ कळवून अधिकाऱ्यांसह घटनास्थळी भेट देऊन घटनेचा रितसर पंचनामा करून नुकसान भरपाई मिळेपर्यंत यशवंत क्रांती संघटनेच्या माध्यमातून पाठपुरावा सुरू ठेवला होता. अखेर केलेल्या पाठपुराव्यास यश येऊन मेंढपाळ बिरु सयाजी अनुसे यांच्या खात्यावर मृत शेळ्यांच्या नुकसान भरपाई पोटी ६७ हजार १२१ रुपये जमा करण्यात आले.
नुकसान भरपाई मिळण्यासाठी यशवंत क्रांती संघटनेचे संस्थापक अध्यक्ष संजय वाघमोडे, शिराळा वनपरिक्षेत्र अधिकारी पारधी साहेब,वनरक्षक भिवा कोळेकर बावची, वनमजुर विक्रम टिबे, विजय मदने गोटखिंडी, निवास उगळे, शंकर रकटे बावची, डॉ. सचिन वंजारी पशुधन अधिकारी बावची, यशवंत क्रांती संघटनेच्या शाखा बागणी व बु. वठार शाखेचे पदाधिकारी यांचे सहकार्य लाभले.
मेंढपाळ बिरु अनुसे यांनी नुकसान भरपाई मिळाल्यानंतर संघटनेच्या पदाधिकारी यांचा सत्कार करून संघटनेच्या सर्व पदाधिकाऱी, वनविभाग व पशुसंवर्धन अधिकारी यांचे आभार मानले. व संघटनेच्या पदाधिकारी यांचा सत्कार केला यावेळी यशवंत क्रांती संघटनेचे संस्थापक अध्यक्ष संजय वाघमोडे, कोल्हापूर जिल्हा उपाध्यक्ष दादासो गावडे, जिल्हा संघटक पिंटू गावडे, हातकणंगले तालुका अध्यक्ष यशवंत वारसा, अतुल धनगर सत्यजित प्रकाश अनुसे,अनिल अनुसे मिलिंद अनुसे , विठ्ठल अनुसे बिरू अनुसे, रोहित अनुसे, निंगाप्पा काळे, उत्तम तांदळे, इत्यादी पदाधिकारी उपस्थित होते.
0 टिप्पण्या