अकलूज एस टी आगारात प्रवासी राजा दिन व कामगार पालक दिन साजरा

 


आकाश भाग्यवंत नायकुडे 

मुंबई दिनांक 29/7/2024 : विभागाच्या वेळापत्रकाप्रमाणेअकलूज नवीन बसस्थानक येथे  सकाळी १० ते १२ वाजेपर्यंत प्रवासी राजा दिन तर दुपारी २ ते ५ या वेळेत कामगार पालक दिन साजरा करण्यात आला.या अभियानाची संकल्पना डॉ. माधव कुसेकर (उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक  महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ) यांची असून या अभियानाचा उद्देश प्रवासी व कामगार यांच्या अडीअडचणी  प्रत्यक्ष विभाग नियंत्रक यांनी ऐकून घेऊन त्यावर लवकरात लवकर तोडगा काढून तक्रारीचे निवारण करणे हा आहे. त्याअनुषंगाने अकलूज आगारात विभाग नियंत्रक विनोदकुमार भालेराव, विभागीय वाहतूक अधिकारी अजय पाटील व कामगार अधिकारी घाटगे या सोलापूर विभागीय कार्यालयातील अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष येऊन सकाळी १० ते दुपारी ५ या वेळेत प्रवासी  व कामगार यांच्या अडी अडचणी समजून घेऊन त्यावर उपाय योजना करून अडचणी तत्काळ सोडविण्याबाबत आगार प्रशासनास आदेश दिले व त्याबाबत मार्गदर्शन केले.

या अभियानाच्या दिवशी प्रवासी तक्रार एक व कामगार तक्रारी पाच प्राप्त झाल्या असून तक्रारींचे निराकरण तत्काळ करण्यात आले. प्रवासी व कामगार यांच्या तक्रारी ऐकून घेण्यासाठी व त्यावर उपाय योजना करण्यासाठी विभागीय अधिकाऱ्यांसोबत आगारातील अधिकारी प्रमोद शिंदे आगार व्यवस्थापक,केतन सोनवलकर , स्थानक प्रमुख,पंकज सावंत आगार लेखाकार,विजय रंदवे, वाहतूक नियंत्रक हे उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या