आनंदी विचार ╭══════════════╮ ✍️ HAPPY THOUGHTS ╰══════════════╯


 .      आनंदी विचार ╭══════════════╮

 ✍️ HAPPY  THOUGHTS ╰══════════════╯ 

वृत्त एकसत्ता न्यूज

संकलक : आकाश भाग्यवंत नायकुडे

अकलूज दिनांक 25/11/2026 :

आपल्या सोबत असणारी माणसं जगायला शिकवतात. तर आपल्याला सोडून जाणारे पुढं कस वागायचं ते शिकवतात. म्हणून माणसांचं महत्त्व आयुष्यात मोलाच असत. मग ते येणारे असोत की जाणारे,

जीवनात पैशांची गरज भासली तर ते व्याजानेही मिळतात. पण माणसाची साथ व्याजाने मिळायची सुविधा अजुन सुरु नाही झाली, म्हणून तोपर्यंत तरी नाती जपा. आनंदात तर परके पण सामील होतात. पण तुमच्या दु:खात जो न बोलवता सामील होतो तो तुमचा असतो.

आयुष्यात प्रत्येकाच्या निंदेला उत्तर द्यायचं नाही. कारण निंदा ही बुद्धीच्या कमकुवत पणामुळे होते आणि त्याला उत्तर न देणं हे आपल्या मनाच्या मोठेपणा असतो,

अंतरंगातील विशुद्धता पवित्र विचार जन्माला घालते. मनाची शुध्दता म्हणजे विचार शून्यता नव्हे तर विचारांच्या गर्दीतही विवेकाचा दिवा तेवत ठेवणे.

अपमानप्रसंगी संयम राखणे, मत्सराच्या जागी सद्भावना जागवणे, अहंकारा ऐवजी नम्रता स्वीकारणे आणि संकटातही धैर्य न सोडणे ही मनाच्या परिपक्वतेची खरी लक्षणे आहेत. खूपदा आपला संघर्ष इतरांशी नसतो, तर स्वतःच्या अंतरंगातील दुर्बलता, विकार आणि दुराग्रहांशी असतो. आत्मचिंतनाचे शस्त्र, विवेकाची ढाल आणि द्रूढ निश्चयाचे बळ सोबत घेऊन मन जिंकले तर विपरीत स्थितीतही मनुष्यस्वभाव कोजागिरीच्या चंद्रासारखा उजळून निघतो,

✍️ प्रा. एस. एम. पाटील

 देवगाव, तालुका-पारोळा (जळगाव)

✒️संकलन : प्रविण सरवदे, कराड,

   ┈┉❀꧁꧂🥳꧁꧂❀┉┈

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या