विचारधारा

 

विचारधारा

वृत्त एकसत्ता न्यूज

संकलक : आकाश भाग्यवंत नायकुडे

अकलूज दिनांक 25/11/2026 :

सध्याचे वातावरण खूप स्पर्धात्मक आहे. शालेय जीवनात नेहमीच अशा छोट्या-मोठ्या स्पर्धा होत असतात. आपण त्यात सहभागी होतो; कधी जिंकतो, तर कधी हरतो.

खरे तर, जिंकणे हा स्पर्धेचा हेतू न ठेवता सहभागी होणे व त्यामध्ये जास्तीत जास्त चांगल्या प्रकारे सहभाग नोंदवणे महत्त्वाचे असते. स्पर्धा जिंकलो तर खूपच छान; पण हरलो तरी सहभागाचा आनंद लुटायचा.

मुलांनो, आपण प्रत्येक वेळी स्पर्धा जिंकूच असे नसते; पण सहभागातून आपण अनुभवसंपन्न होतो. 'कुठे कमी पडलो? काय चुकले? काय केले पाहिजे?' हे आत्मपरीक्षण सुरू होते आणि आपोआप सुधारणा होत जाते.

स्पर्धा नेहमी निकोप असावी. जे जिंकले, त्यांच्याबद्दल मनात कोणताही आकस न ठेवता त्यांच्याकडून काही शिकण्याचा प्रयत्न करा.

सौ. स्नेहलता स. जगताप.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या