दिवाळी विशेषांक स्पर्धा - २०२६ चे आयोजन
वृत्त एकसत्ता न्यूज
पंढरपूर, प्रतिनिधी : ड्रीम फाऊंडेशन सोलापूर व कुसुमश्री सार्वजनिक वाचनालय, अभ्यासिका यांच्या संयुक्त विद्यमाने सोलापूर जिल्हास्तरीय उत्कृष्ट व वैशिष्ट्यपूर्ण दिवाळी अंक स्पर्धा - २०२६ चे आयोजन करण्यात आले आहे अशी माहिती ड्रीम फाऊंडेशनचे अध्यक्ष काशिनाथ भतगुणकी यांनी दिली आहे.
या स्पर्धातील विजेत्यांना रोख रक्कम व सन्मानचिन्ह याव्यतिरिक्त उत्तेजनार्थ तीन पारितोषिके देण्यात येणार आहेत. तसेच सर्व सहभागी दिवाळी विशेषांक संपादकांना सहभाग प्रमाणपत्र देण्यात येणार आहे.
या दिवाळी विशेषांक स्पर्धा - २०२६ स्पर्धेकरिता २०२६ चे दिवाळी विशेषांक २ प्रतीत श्री. प्रवीण शहा, सरस्वती फर्निचर, श्रीराम मंगल कार्यालय समोर इसबावी, ता. पंढरपूर. जिल्हा सोलापूर. 413310. संपर्क : 8329354008/ 9890108108 येथे दिनांक १५ डिसेंबर, २०२६ पर्यंत प्रत्यक्ष पोहोच करावेत. किंवा पाठवावेत. निवड समितीच्या माध्यमातून निकष गुणांकण करून निवड करण्यात येणार आहे. निवड समितीच्या माध्यमातून जाहीर करण्यात येणारा निकाल हा अंतिम राहणार आहे. बक्षीस वितरण 26 डिसेंबर 2026 रोजी पंढरपूर येथे करण्यात येणार आहे.
दिवाळी विशेषांक प्रकाशित केलेल्या जास्तीत जास्त संपाकांनी या स्पर्धेत सहभागी व्हावे असे आवाहन कुसुमश्री सार्वजनिक वाचनालयाच्या प्राची प्रशांत माळवदे यांनी केले आहे.
0 टिप्पण्या