भावना

 


भावना 

वृत्त एकसत्ता न्यूज   

संकलक : आकाश भाग्यवंत नायकुडे 

अकलूज दिनांक 28/10/2026 :

कुठल्याही नात्यात नेहमी शब्दांनीच भावना व्यक्त करता येतात असं नाही. कधी कधी समोरच्याच्या शांततेमागचं दुःख ओळखावं लागतं, चेहऱ्यावरच्या हसण्यामागची वेदना समजून घ्यावी लागते. नातं टिकवण्यासाठी फक्त प्रेम असून चालत नाही, तर, विश्वास, आदर, काळजी आणि एकमेकांच्या भावना समजून घेण्याची तयारीही असावी लागते. प्रत्येक वेळी आपलीच बाजू योग्य ठरवण्यापेक्षा समोरच्याचं मन समजून घेतलं तर, अनेक गैरसमज आपोआप दूर होतात कारण, शेवटी नातं मोठं नसतं, तर त्या नात्यात एकमेकांना दिलेली मनाची जागा मोठी असते. खरं नातं तेच, जिथे शब्दांपेक्षा भावना आणि अहंकारापेक्षा समजूतदारपणा मोठा असतो. नाती जपतांना समोरच्याला समजून घेणं, त्याच्या भावनांचा आदर करणं आणि त्याला मनापासून ऐकून घेणं खूप महत्त्वाचं असतं.

┈┉❀꧁꧂🥳꧁꧂❀┉┈

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या