विचारधारा

 

विचारधारा

वृत्त एकसत्ता न्यूज

संकलक : आकाश भाग्यवंत नायकुडे

अकलूज दिनांक 26/11/2026 :

बरोबर ७७ वर्षांपूर्वी, म्हणजेच २६ नोव्हेंबर १९४९ रोजी भारतीय संविधानाचा ठराव मंजूर झाला आणि पुढे २६ जानेवारी १९५० रोजी ते लागू होऊन भारत प्रजासत्ताक देश झाला. लोकशाही देश कसा चालवावा हे सांगणारे कायद्याचे पुस्तक म्हणजे संविधान!

आजच्याच दिवशी घडलेली दुसरी घटना म्हणजे मुंबईवरील दहशतवादी हल्ला. या दुर्दैवी हल्ल्यात अनेक पोलिस अधिकारी व भारतीय सैनिक यांना वीरमरण आले, तर अनेक निरपराध व परदेशी नागरिकांना आपले प्राण गमवावे लागले. त्या सर्वांना विनम्र अभिवादन!

तारीख तीच पण आठवणी एकदम परस्परविरोधी आहेत. संविधान दिन आपल्याला नागरिकत्वाची, हक्कांची आणि कर्तव्यांची जाणीव करून देणारा दिवस आहे; तर दहशतवादी हल्ला आपल्याला आपल्या शत्रूच्या कपटी कारस्थानाची आठवण करून देणारा दिवस आहे.

भारतीय नागरिक म्हणून देशाचे स्वातंत्र्य व सार्वभौमत्व अबाधित राखण्यासाठी आपण सर्व जण सदैव कटिबद्ध राहू.

सौ. स्नेहलता स. जगताप.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या