⏹️ मुळा खाण्याचे आरोग्यदायी फायदे
वृत्त एकसत्ता न्यूज
संकलन : आकाश भाग्यवंत नायकुडे
अकलूज दिनांक 7/11/2026 :
मुळा खाणे हे आरोग्यासाठी फायदेशीर आहे. हिवाळ्यात शरीरासाठी लाभदायक असलेलं कंदमुळ म्हणजे मुळा. मुळा जर खायला आवडत नसला तरी त्याची भाजी, किंवा पराठा बनवून खाल्ला पाहिजे.
◆ मुळ्याच्या ताज्या पानांचा रस आणि बियांमुळे लघवी स्वच्छ होते. मूतखडाही बरा होतो.
◆ मुळा किडनीच्या विविध विकारांवर औषधी ठरतं.
◆ रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यास मदत करतं.
◆ कच्चा मुळा दररोज पहाटे अनुशा पोटी खाल्ल्याने काही दिवसातच कावीळ पूर्णत: बरी होते.
◆ मुळा पाणीदार असल्याने याच्या सेवनाने भूक शमते. म्हणून वजन कमी करू इच्छिणाऱ्यांनी याचं सेवन करावं.
◆ मुळा खाल्ल्याने रक्त शुद्ध होते. रक्तात ऑक्सिजनचा पुरवठाही होतो.
◆ पिवळे दात पांढरेशुभ्र करण्यासाठी मुळ्याच्या तुकड्यावर लिंबू पिळून तो तुकडा थोडा वेळ चावून थुंकून टाका. या उपायाने दात चमकदार होतील.
◆ मुळा वजन कमी करण्यास लाभदायक आहे. जेवताना मुळा खाल्ल्याने लवकर पोट भरते. अतिखाण्या पासूनही बचाव होतो. मुळ्यात जास्त उष्मांकही नसतो.
◆ ज्यांची पचनक्रिया व्यवस्थित नाही आणि पोट साफ होत नसेल, त्यांनी कच्चा मुळा खावा. मूळव्याध कमी करण्यास मुळा फायदेशीर आहे.
◆ मुळ्यात असलेल्या क जीवनसत्त्व, फॉस्फरस, झिंक व बी-कॉम्प्लेक्स मुळे त्वचाविकार दूर होतात. यात भरपूर पाणी असल्याने त्वचेचा ओलावा राहतो. तसेच त्वचा कोरडी किंवा निर्जीव होत नाही.
संकलन : मिलिंद पंडित, कल्याण
0 टिप्पण्या