विचारधारा

 

विचारधारा

वृत्त एकसत्ता न्यूज

संकलक : आकाश भाग्यवंत नायकुडे

अकलूज दिनांक 18/11/2026 :

या वयात ज्ञानार्जन महत्त्वाचे असते. पूर्वी मुले गुरुगृही जाऊन जीवनोपयोगी ज्ञान व युद्धकौशल्ये शिकत असत. हळूहळू यात बदल होत शालेय शिक्षण सुरू झाले.

पुस्तकी ज्ञान जरी महत्त्वाचे असले, तरी समाजात वावरताना 'व्यवहारज्ञान' असणे खूप महत्त्वाचे असते. अवतीभोवतीचे निरीक्षण, प्रसंगावधान, निर्णयक्षमता वगैरे गोष्टी विकसित होणे अत्यंत गरजेचे असते.

मुलांनो, फक्त पुस्तकी ज्ञान आणि वेगवेगळ्या पदव्या मिळवणे म्हणजे सगळे काही नव्हे. कौटुंबिक जबाबदारी, सामाजिक भान आणि कष्ट करण्याची तयारी असणेही तितकेच महत्त्वाची असते.

नैतिक मूल्ये जपत जीवन जगणे व इतरांना मदतीचा हात देणे, हेच खरे शिक्षण होय!

सौ. स्नेहलता स. जगताप.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या