विचारधारा
वृत्त एकसत्ता न्यूज
संकलक : आकाश भाग्यवंत नायकुडे
अकलूज दिनांक 16/11/2026 :
आजकाल तंत्रज्ञानाच्या युगात तुमचे मैदानी खेळ खूपच कमी झाले आहेत. फावला वेळ मिळाला, की अनेक मुले मोबाईल, टीव्ही किंवा व्हिडिओ गेम्समध्येच अडकून पडलेली दिसतात. सतत एका जागी बसून राहिल्यामुळे शारीरिक हालचाल मंदावते आणि आरोग्यावर वाईट परिणाम होतो.
मुलांनो, जसा अभ्यासाने बुद्धीचा विकास होतो, तसाच मैदानी खेळ आणि व्यायामामुळे शरीराचा विकास होतो. मैदानावर खेळल्यामुळे केवळ शरीरच सुदृढ होत नाही, तर एकमेकांसोबत मिळून काम करण्याची सवय, नेतृत्वगुण आणि हार-जीत खिलाडूवृत्तीने स्वीकारण्याची शिकवण मिळते.
'निरोगी शरीरातच निरोगी मन वास करते' हे नेहमी लक्षात ठेवा. त्यामुळे रोज किमान एक तास मोकळ्या हवेत जाऊन मैदानी खेळ खेळण्याची किंवा योगासने-व्यायाम करण्याची सवय स्वतःला नक्की लावून घ्या.
बौद्धिक प्रगतीच्या बरोबरीनेच शारीरिक तंदुरुस्तीचे महत्व ओळखून स्वतःचा सर्वांगीण विकास घडवा.
सौ. स्नेहलता स. जगताप.

0 टिप्पण्या