‼️ ब्लूटूथ ची कहाणी ‼️
वृत्त एकसत्ता न्यूज
संकलक : आकाश भाग्यवंत नायकुडे
अकलूज दिनांक 28/10/2026 :
आज मोबाईलचा Bluetooth ऑन केला की जगभरात दोन डिव्हाईस मध्ये शून्य मिनिटात नाते जुळते. पण ‘ब्लूटूथ’ या तंत्रज्ञानाचे नाव एखाद्या अत्याधुनिक प्रयोगशाळेत जन्माला आले नाही. त्यामागे आहे एका बार मधली संध्याकाळ, दोन इंजिनिअर्स, बिअरचे ग्लास आणि एक हजार वर्षांपूर्वीचा Viking राजा.
१९९७ मध्ये Intel, Ericsson, Nokia आणि काही मोठ्या सॉफ्टवेअर कंपन्यांचे इंजिनिअर कॅनडात, टोरंटोत एकत्र आले. उद्देश होता कंप्युटर, मोबाईल फोन आणि इतर उपकरणांना कमी अंतरावर वायरलेस पद्धतीने जोडण्यासाठी एक सारखा सॉफ्टवेअर प्रोग्रॅम तयार करणे. सॉफ्टवेअर तयार होतच होते; पण त्याला नाव काय द्यावं हे मात्र सापडत नव्हते. एका संध्याकाळी Intel चे इंजिनिअर जिम कॉर्डक आणि Ericsson चे स्वेन मॅटिसन दिवसभराच्या मिटिंगा संपवून लोकल बार मध्ये गेले. कामाच्या चर्चे पासून थोडं दूर गेल्यावर गप्पा इतिहासाकडे वळल्या. मॅटिसन स्वीडिश असल्यामुळे कॉर्डक यांनी व्हायकिंग बद्दल विचारायला सुरुवात केली. मॅटिसनने कॉर्डकला एक कादंबरी The Long Ships वाचण्याचा सल्ला दिला. कादंबरी वाचताना कॉर्डकला एक कॅरेक्टर सापडलं, ते म्हणजे Harald Bluetooth नावाचा राजा.
दहाव्या शतकातील या डॅनिश राजाने डेन्मार्क आणि नॉर्वे मधील वेगवेगळ्या गटांना एकछत्री सत्तेखाली आणण्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. हे वाचल्यावर कॉर्डकच्या डोक्यात अचानक एक भन्नाट कल्पना चमकली. या Bluetooth नावाचा राजाने अनेक छोट्या छोट्या सत्तांना एकत्र आणलं, तसंच काम आपलं तंत्रज्ञानही करणार आहे. आता गंमतीचा भाग असा की Bluetooth हे त्या राजाचं टोपणनाव होतं. दातांना झालेल्या काही रोगामुळे त्याचे दात निळे पडले होते म्हणून त्याला Bluetooth म्हणत. पर्सनल कॉम्युटर आणि मोबाइल सारख्या वेगवेगळ्या technology ecosystems ना एकाच wireless standard ने जोडायचे होते; म्हणून प्रकल्पासाठी तात्पुरते नाव ठेवण्यात आले Bluetooth.
हे नाव कायम ठेवण्याचा सुरुवातीला अजिबात विचार नव्हता. Marketing टीमला त्यापेक्षा अधिक आकर्षक नाव हवे होते. RadioWire आणि PAN (Personal Area Network) अशी नावं चर्चेत होती. पण ब्रॅंडिंगच्या जगात कधी कधी technology पेक्षा ट्रेडमार्क जास्त शक्तिशाली ठरतो. PAN हे नाव आधीच trademark च्या अडचणीत होते आणि RadioWire चे नाव वेळेत legal clearance मधून बाहेर आले नाही. आणि मग जे नाव फक्त तात्पुरतं म्हणून ठेवले होते, तेच नाव प्रॉडक्ट लॉन्च करताना ठेवलं गेलं Bluetooth
पण कथेला अजून एक सुंदर शेवट आहे. ‘ब्लूटूथ’ चा लोगो हा कोणताही आधुनिक डिझाईन नाही. प्राचीन स्कॅंडेनेव्हिअन लिपीतून घेतलेल्या Hagall आणि Bjarkan या दोन अक्षरांचं मिश्रण आहे. हॅराल्डचा ‘H’(ᚼ)आणि ब्लूटूथचा ‘B’(ᛒ). ही दोन्ही चिन्हे एकमेकांत मिसळली आणि तयार झालं Bluetooth चे चिन्ह.
थोडक्यात, हजार वर्षांपूर्वीच्या व्हायकिंग राजाचं नाव, एका स्विडिश इंजिनिअर आणि एका अमेरिकन इंजिनिअरच्या गप्पा आणि एका बार मधली संध्याकाळ या सगळ्यांनी मिळून आपल्या मोबाईलच्या सेटिंग्स मध्ये कायमचे घर केलं.
©️ बोभाटा
संकलन : मिलिंद पंडित, कल्याण
🍁 🍁 🍁
⌨️⌨️⌨️⌨️⌨️⌨️⌨️⌨️⌨️⌨️⌨️

0 टिप्पण्या