ओठांवरचं हलकंसं हसू.......
वृत्त एकसत्ता न्यूज
संकलक : आकाश भाग्यवंत नायकुडे
अकलूज दिनांक 23/11/2026 :
ओठांवरचं हलकंसं हसू
मनाला स्पर्शून जातं,
शब्दांविना
कधी कधी
खूप काही
सांगून जातं.
नसतो त्यात मोठेपणा,
नसते दिखाव्याची छटा,
एका गोड
स्मितहास्याने
फुलते
आनंदाची वाट.
कुणी दुःखी असताना
प्रेमाने हसून पाहावं,
त्याच्या उदास मनाला
आशेचं
आभाळ द्यावं.
रागाच्या क्षणी हसू,
नात्यांना जोडून जातं.
मनातल्या कटुतेवर
प्रेमाचं फूल
उमलवतं.
स्मितहास्य हीचं
अशी देणगी,
जिला मोल कधीच नसतं*
पण ते मनापासून
दिलं तर
त्याहून
सुंदर
काहीचं नसतं.
❝ आपुलकीच्या माणसांसाठी ❞
====================

0 टिप्पण्या