माणसाने कितीही प्रयत्न केले.....
वृत्त एकसत्ता न्यूज
संकलन : आकाश भाग्यवंत नायकुडे
अकलूज दिनांक 6/11/2026 :
माणसाने कितीही प्रयत्न केले
तरी अंधारात सावली,
म्हातारपणात शरीर
आणि,
आयुष्याच्या
शेवटच्या काळात
पैसा कधीचं साथ
देत नाही.
साथ देतात ती
फक्त आपण
जोडलेली जवळची
माणसंच.
मिठाच्या बरणीला कधीचं
मुंग्या लागत नाहीत,
पण साखरेचा
एक कण
जरी असला
तरी मुंग्या लागतात.
माणसांचहि तसचं आहे.
गोडवा जिभेवर असेल
तर सारेचं
धावून येतील,
पण मिठासारखा
खारटपणा असेल,
तर कोणीचं येणार नाही.
ज्याची वाणी गोड
त्याचं आयुष्य
गोड असतं.
❝ आपुलकीच्या माणसांसाठी ❞
====================

0 टिप्पण्या