मनाची शुद्धता

 


मनाची शुद्धता

वृत्त एकसत्ता न्यूज

संकलक : आकाश भाग्यवंत नायकुडे

अकलूज दिनांक 16/11/2026 :

आज आपण प्रगतीच्या आणि विकासाच्या मागे इतके वेगाने धावत आहोत की, या शर्यतीत आपण निसर्गाला कुठेतरी खूप मागे सोडून देत आहोत. सिमेंटची जंगले उभी करताना आपण आपल्या सभोवतालची नैसर्गिक हिरवळ हरवत चाललो आहोत.

खरा विकास तोच असतो, जो शाश्वत असतो आणि निसर्गाशी सुसंगत असतो. निसर्गाचा समतोल बिघडून केलेली प्रगती भविष्यात विनाशालाच आमंत्रण देते. सह्याद्रीच्या कुशीत वसलेले आपले गडकोट जसे निसर्गाशी एकरूप होऊन शतकानुशतके खंबीर उभे आहेत, तसाच आपला विकासही निसर्गाला पूरक असायला हवा.

विकासाची प्रक्रिया केवळ मोठ्या पायाभूत सुविधा किंवा कारखाने उभारणीतूनच नव्हे, तर ती निसर्गाप्रती असलेल्या आपल्या आचरणातूनही दिसायला हवी. पर्यावरणाचे रक्षण करणे, वृक्षलागवड करणे आणि कमीत कमी प्रदूषण करणे, ही काळाची आणि भावी पिढीची मोठी गरज आहे.

आजचा संकल्प

दैनंदिन जीवनात कमीत कमी प्रदूषण होईल, निसर्गाला हानी पोहोचणार नाही अशी जीवनशैली अंगीकारण्याचा प्रामाणिक प्रयत्न करूया आणि शाश्वत विकासात आपले योगदान देऊया.

सौ. स्नेहलता स. जगताप.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या