मनाची शुद्धता

 

मनाची शुद्धता

वृत्त एकसत्ता न्यूज

संकलक : आकाश भाग्यवंत नायकुडे

अकलूज दिनांक 25/11/2026 :

दैनंदिन जीवनात कितीही अडचणी आल्या किंवा काही नको असलेल्या घटना घडल्या, तरी त्या अमान्य न करता स्वीकारणे शहाणपणाचे ठरते.

इथे सकारात्मक विचारांची गरज असते. 'जे घडायचे होते ते घडले, आता पुढे काय?' असा विचार करून त्यातून मार्ग काढणे आणि जास्त भावनिक न होता व्यावहारिक पातळीवर विचार करणे ज्यांना जमते, ते आनंदी जीवन जगू शकतात.

आपल्या मनाला अशा पद्धतीने विचार करण्याची सवय लावणे खूप गरजेचे आहे. ठरवले, तर आपण आपला स्वभावही बदलू शकतो. दुसऱ्याच्या आनंदात आनंदी होणे, हे तर फारच चांगले!

आजचा संकल्प

स्वतःचे दुःख कवटाळत बसण्यापेक्षा इतरांच्या दुःखात त्यांच्या उपयोगी पडू, तसेच स्वतः आनंदात राहण्याचा आणि इतरांनाही आनंदी करण्याचा निश्चय करू.

सौ. स्नेहलता स. जगताप.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या