विचारधारा
वृत्त एकसत्ता न्यूज
संकलक : आकाश भाग्यवंत नायकुडे
अकलूज दिनांक 17/11/2026 :
बालपणीच्या आठवणी मोठे झाल्यानंतर सांगण्यात खूप मजा असते. कधी काही वात्रटपणा केलेला असतो, कधी कोणाच्या बागेतील चिंचा-बोरे काढलेली असतात. मोठ्यांचे रागावणे, क्वचित मार खाणे; हे सर्व मोठेपणी आठवले की हसू येते.
झाडावर चढून कैऱ्या तोडणे, विहिरीत पोहणे, सायकल चालवणे, गोट्या खेळणे, असे निखळ बालपण तुम्ही अनुभवताय का?
मुलांनो, मोबाईलच्या अधीन होऊन त्याचे शारीरिक व मानसिक दुष्परिणाम भोगण्यापेक्षा, हे मैदानी खेळ खेळणे किती चांगले! सध्या तुमची पिढी मोबाईलच्या किती आहारी गेली आहे? नंतर पश्चात्ताप करण्यापेक्षा अगोदरच शहाणे व्हा.
मोबाईल आणि टीव्हीपासून दूर राहा, आरोग्यम् धनसंपदा चे महत्व जाणत स्वतःला घडवा.
सौ. स्नेहलता स. जगताप.

0 टिप्पण्या