गरिबांची आई
वृत्त एकसत्ता न्यूज
संकलक : आकाश भाग्यवंत नायकुडे
अकलूज दिनांक 23/11/2026 :
भारतात आपण सेलिब्रेटी म्हणजे काय बघतो? मोठा बंगला, 10 गाड्या, महागडे कपडे, दुबईत सुट्ट्या, आणि वाढदिवसाला 5 कोटींची पार्टी!
पण अमेरिकेत एक अशी अभिनेत्री आहे, जिने हॉलिवूडची राणी असूनही, आपलं आयुष्य गरिबांसाठी वाहून घेतलं! तिचं नाव -अँजेलिना जोली!
आपले सेलिब्रेटी कुठे जातात? मॉलच्या उद्घाटनाला, फिल्मच्या प्रमोशनला, अवॉर्ड शो ला!
पण अँजेलिना कुठे जाते माहिती आहे का मित्रांनो ? इराक, सिरीया, अफगाणिस्तान, हैती, पाकिस्तान! जिथे युद्ध चालू आहे, जिथे लोक घरदार सोडून पळतायत, जिथे लहान मुलं उपाशी मरतायत - तिथे ही बाई स्वतःच्या जीवाची पर्वा न करता जाते!
तिने UNHCR ची Special Envoy म्हणून 20 वर्षे काम केलं! 60 पेक्षा जास्त देशात ती पायी फिरली! तिने निर्वासितांच्या कॅम्पमध्ये जाऊन त्यांच्यासोबत जमिनीवर बसून जेवली, त्यांची मुलं मांडीवर घेतली!
ती म्हणते -"मी जेव्हा कंबोडियात शूटिंग करत होते, तेव्हा मी बघितलं - एका आईकडे आपल्या मुलाला द्यायला अन्न नाही! त्या दिवशी मला कळलं, माझं आयुष्य फक्त माझ्यासाठी नाही!"
आपल्याकडे कसं असतं, सेलिब्रेटी 10 हजाराचा चेक देतात आणि 10 लाखाची जाहिरात करतात, पेपरमध्ये छापून आणतात!
पण अँजेलिनाने काय केलं बघ -1 मिलियन डॉलर (8 कोटी रुपये) एकाच वेळी UNHCR ला दिले! तोपर्यंत एका व्यक्तीने दिलेलं सर्वात मोठं दान होतं.कोरोनामध्ये उपाशी मुलांसाठी 1 मिलियन डॉलर दिले,कंबोडिया, केनिया, अफगाणिस्तानमध्ये मुलींसाठी 10 शाळा बांधल्या,इथिओपियात AIDS चा दवाखाना काढला. इतकंच नाही तर अनाथ मुलांना मोफत वकील देण्यासाठी KIND संस्था काढली!
आणि सगळ्यात मोठं तिने 3 अनाथ मुलांना दत्तक घेतलं! कंबोडिया, इथिओपिया, व्हिएतनामची मुलं आज तिची स्वतःची मुलं आहेत! तिने त्यांना फक्त पैसा नाही दिला, तिने त्यांना "आई" दिली!
मित्रांनो गाडी, बंगला, पैसे, सत्ता सगळं काही इथेच राहणार आहे पण, एखाद्या गरीबाच्या चेहऱ्यावर आणलेलं हसू, आपण केलेलं दान हिच आपली मरणोत्तर ओळख असणार आहे. प्रत्येकाने आयुष्यात एकदातरी Angelina Jolie सारखं जगून बघा
====================

0 टिप्पण्या