विचारधारा
वृत्त एकसत्ता न्यूज
संकलन : आकाश भाग्यवंत नायकुडे
अकलूज दिनांक 30/10/2026 :
आपल्याला नेहमी आई-वडील आणि गुरूंचा आदर करण्याची शिकवण दिली जाते. आपण त्यांच्यातच देव पाहिला, तर वेगळ्या मंदिरात जाण्याचीसुद्धा आपल्याला कधी गरज पडणार नाही.
कष्ट करून मिळवलेली कमाई स्वतःसाठी खर्च न करता मुलांसाठी उपयोगात आणणारे आपले वडील आणि स्वतः ताजे, सकस अन्न बनवून मुलांना आग्रहाने वाढणारी व स्वतः उरलेले अन्न खाणारी आपली आई, हीच आपली खरी दैवते आहेत.
मुलांनो, तुमच्या (मुला-मुलींच्या) चुकीच्या वागण्याने त्यांना समाजात कधीही मान खाली घालावी लागू नये; किंवा नाकर्त्या मुलांसाठी कोणापुढे हात पसरावे लागू नयेत, याची तुम्ही सदैव दक्षता घ्या. आपले चारित्र्य स्वच्छ ठेवा आणि स्वाभिमानाने जगा. स्वावलंबी व्हा.
आई-वडिलांना देव्हाऱ्यात बसवून पूजा करू नका, पण त्यांची मने नक्की जपा.
सौ. स्नेहलता स. जगताप.
===================

0 टिप्पण्या