कोरबू आणि शेख यांचा शुभविवाह थाटाने संपन्न


कोरबू आणि शेख यांचा शुभविवाह थाटाने संपन्न

वृत्त एकसत्ता न्यूज

आकाश भाग्यवंत नायकुडे

अकलूज दिनांक 17/11/2026 :

कचरूद्दीन शहाबुद्दीन कोरबू राहणार काजी गल्ली अकलूज यांचे चिरंजीव सरताज आणि नवाज मोहम्मद शेख राहणार लातूर यांची कन्या सोफिया यांचा शुभविवाह रविवार दिनांक 15/11/2026 रोजी लातूर येथे अत्यंत थाटाने संपन्न झाला. त्यांच्या विवाह प्रित्यर्थ मंगळवार दिनांक 17 रोजी स्वयंवर मंगल कार्यालय अकलूज - माळीनगर रोड, अकलूज येथे रिसेप्शन सोहळा आयोजित केलेला होता.

याप्रसंगी विविध क्षेत्रातील मान्यवरांनी उपस्थित राहून नव वधूवरांना शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी विविध क्षेत्रातील मान्यवरांसह भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे माळशिरस तालुका माजी अध्यक्ष आणि जी. एस. स्पोर्ट्स अकॅडमी अकलूज चे संस्थापक अध्यक्ष गिरीश प्रभाकर शेटे, अकलूज वैभव आणि वृत्त एकसत्ता चे संस्थापक संपादक, सेवा जेष्ठ पत्रकार भाग्यवंत  लक्ष्मण नायकुडे हे उपस्थित होते.

सर्व उपस्थित मान्यवरांचे रुस्तुम शहाबुद्दीन कोरबू यांनी स्वागत, सन्मान केला.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या