पंढरपूर येथे राजमाने 卐 केदार शुभविवाह सोहळा संपन्न
वृत्त एकसत्ता न्यूज
आकाश भाग्यवंत नायकुडे
अकलूज दिनांक 16/11/2026 : शिवैक्य सुरेश (काका) शिवलिंग राजमाने यांची नात व शिवैक्य संतोष सुरेश राजमाने (राहणार टेंभुर्णी, तालुका माढा, जिल्हा सोलापूर) यांची सुकन्या चि.सौ.कां. साक्षी आणि चि. युवराज (शिवैक्य अण्णाप्पा हणमंत केदार यांचे नातू व श्री महादण्णा अण्णाप्पा केदार राहणार डोणज, तालुका मंगळवेढा, जिल्हा सोलापूर यांचे सुपुत्र) यांचा शुभविवाह सोहळा सोमवार दिनांक 16/11/2026 रोजी दुपारी बारा वाजून एक मिनिट या शुभमुहूर्तावर अत्यंत थाटाने संपन्न झाला.
श्री यश पॅलेस, कराड नाका, कोर्टी रोड, पंढरपूर येथे संपन्न झालेल्या या विवाह सोहळ्याप्रसंगी उपस्थित असलेल्या विविध क्षेत्रातील मान्यवरांचे राजमाने आणि केदार परिवाराच्यावतीने स्वागत व सन्मान करण्यात आला.
याप्रसंगी विविध क्षेत्रातील मान्यवरांसह भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे माळशिरस तालुका माजी अध्यक्ष आणि जी. एस. स्पोर्ट्स अकॅडमी अकलूज चे संस्थापक अध्यक्ष गिरीश प्रभाकर शेटे, अकलूज वैभव आणि वृत्त एकसत्ता चे संस्थापक संपादक, सेवा जेष्ठ पत्रकार भाग्यवंत लक्ष्मण नायकुडे, यश गिरीश शेटे हे उपस्थित होते.

0 टिप्पण्या