आज ज्ञान सेतू अभ्यासिका व करिअर मार्गदर्शन केंद्र माळशिरस व अकलूज चा स्नेह मेळावा व सन्मान सोहळा
वृत्त एकसत्ता न्यूज
आकाश भाग्यवंत नायकुडे
अकलूज दिनांक 10/11/2026 : माळशिरस तालुका अधिकारी प्रतिष्ठान संचलित ज्ञान सेतू अभ्यासिका व करिअर मार्गदर्शन केंद्र माळशिरस व अकलूज यांच्यावतीने आज बुधवार दिनांक 10/11/2026 रोजी सायंकाळी 5 वाजता स्नेह मेळावा व सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला आहे.
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान रंजन कुमार शर्मा (विशेष पोलीस महानिरीक्षक कोल्हापूर परिक्षेत्र कोल्हापूर) हे भूषविणार आहेत. प्रमुख पाहुणे म्हणून संतोष पाटील (जिल्हाधिकारी सातारा), अतुल कुलकर्णी (पोलीस अधीक्षक सोलापूर ग्रामीण) हे उपस्थित राहणार आहेत. विश्वास पांढरे (पोलीस अधीक्षक, मानवी हक्क आयोग महाराष्ट्र राज्य), सदाशिव साळुंखे (सचिव, (सेवा निवृत्त) सार्वजनिक बांधकाम विभाग मंत्रालय मुंबई), धनंजय मगर (उपवनसंरक्षक, पुरी ओडिसा), सागर मिसाळ (संचालक, मच्छ व्यवसाय विभाग केरळ), डॉ. रामदास भिसे (वाणिज्य व्यवस्थापक, भारतीय रेल्वे विभाग पुणे), वैभव ढेरे (अतिरिक्त आयुक्त, सोलापूर) इत्यादी मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
विशेष नागरी सन्मान
जपान येथे झालेल्या "आशियाई क्रीडा स्पर्धा 2026" मध्ये रुद्रांक्ष बाळासाहेब वाघमोडे - पाटील या युवकाने नेमबाजी मध्ये वैयक्तिक 1 कास्यपदक आणि सांघिक मध्ये 2 रोप्यपदकं पटकावली. तसेच वयाच्या 22 वर्षी आत्तापर्यंत त्याने एकूण 25 आंतरराष्ट्रीय पदकांची कमाई केली त्यानिमित्त या कार्यक्रमात त्याचा विशेष नागरी सन्मान करण्यात येणार आहे. अक्षता मंगल कार्यालय, माळशिरस - अकलूज रोड, 61 फाटा, माळशिरस येथे होणार असलेल्या या स्नेह मेळावा आणि सन्मान सोहळ्यास उपस्थित राहण्याचे आवाहन माळशिरस तालुका अधिकारी प्रतिष्ठान च्या वतीने करण्यात आले आहे.
0 टिप्पण्या